करोना व्हायरसच्या संकटामुळे टीव्ही मालिका विश्व ठप्प झाले आहे. मात्र यावर मराठी कलाकार व निर्मात्यांनी मिळून अफलातून पर्याय शोधला आहे. लॉकडाउनमध्ये आपापल्या घरीच मालिकेचं चित्रीकरण केलंय. ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ असं या मालिकेचं नाव आहे. याच मालिकेसाठी मराठीतील लोकप्रिय जोडी सखी गोखले आणि सुव्रत जोशी यांनी लंडनहून शूटिंग केलं आहे. शूटिंगचा हा अनुभव कसा आहे, याबद्दल त्यांनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या या विशेष मुलाखतीत सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चित्रीकरण कसं करायचं याबाबत दिग्दर्शकाने फोनवरून कलाकारांना सूचना दिल्या. करोनामुळे आणखी किती दिवस काम बंद ठेवणार या विचाराने लेखक, दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले, स्वप्नील मूरकर, मारुती देसाई व इतर कलाकारांनी हा पर्याय शोधला. या मालिकेत काम करणाऱ्या १६ कलाकारांनी अभिनयासह स्वत:च चित्रीकरण, तर दिग्दर्शकाने घरूनच दिग्दर्शन केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sakhi gokhale and suvrat joshi shooting at home from london watch video ssv
Show comments