कलाविश्वामध्ये सध्या पाहायला गेलं तर प्रत्येक कलाकारामध्ये फिटनेसचं क्रेझ दिसून येतं. अगदी सलमान खानपासून ते हृतिक रोशनपर्यंत प्रत्येक अभिनेता फिटनेसच्या बाबतीत सजग असून अनेक कलाकार त्यांच्या सिक्स पॅक अॅब्जसाठी ओळखले जातात. विशेष म्हणजे त्यांची ही क्रेझ चाहत्यांमध्येही निर्माण झाली आहे. त्यामुळेच अनेक जण सलमान खान, जॉन अब्राहम, हृतिक रोशन, टायगर श्रॉफ यांना सॅक्स पॅक अॅब्जसाठी आपला आदर्श मानतात. परंतु या कलाकारांमध्ये असेही अभिनेते आहेत जे व्यायामाला महत्व देतात. मात्र सिक्स पॅक अॅब्जपासून दूर राहतात.त्यातीलच एक कलाकार म्हणजे खिलाडी अक्षय कुमार. अनेक सुपरहिट चित्रपट देणारा अक्षय व्यायामाच्या बाबतीत विशेष सजग असून तो एका खास कारणासाठी सॅक्स पॅक अॅब्जपासून दूर राहण्याचं. द कपिल शर्माच्या सेटवर त्याने यामागचं कारणही स्पष्ट केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी ‘मिशन मंगल’ या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. भारताच्या मंगळ मोहिमेची खरी कथा या चित्रपटातून दाखविण्यात येणार आहे. अक्षय वास्तवदर्शी आणि अनोखे कथानक असलेल्या चित्रपटांमुळे ओळखला जातो. अक्षयचा ‘मिशन मंगल’ प्रदर्शनाच्या वाटेवर असल्यामुळे सध्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरु आहे. या प्रमोशनसाठी काही दिवसापूर्वी त्याने ‘द कपिल शर्मा’च्या सेटवर हजेरी लावली होती. या सेटवर त्याने व्यायाम करुनही सिक्स पॅक अॅब्जपासून दूर का आहे यामागचं कारण सांगितलं.

१९९६ साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ‘खिलाडियों का खिलाडी’ या चित्रपटाच्या सेटवर अक्षयचा एक लहानसा अपघात झाला होता. या अपघातानंतर अक्षयला स्लिप्ड डिस्क ही समस्या निर्माण झाली. त्यामुळे अक्षय व्यायाम करत असला तरीसुद्धा त्याचे सिक्स पॅक अॅब्ज कधीच दिसत नाहीत. ‘खिलाडिओं के खिलाडी’ या चित्रपटातील एक भागाचं चित्रीकरण सुरु असताना अक्षयला डब्ल्यूडब्ल्यूईमधील सुपरस्टार अंडरटेकरला उचलायचं होतं. या भागाचं चित्रीकरण करत असताना अक्षयने अंडरटेकरला उचललं. मात्र त्यानंतर त्याला पाठदुखीचा त्रास सुरु झाला. त्यामुळे डॉक्टरांनी अक्षयला व्यायाम करताना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. याच कारणास्तव अक्षय जरी फिटनेसफ्रीक असला तरीदेखील तो पोटाचे व्यायाम करताना विशेष काळजी घेतो. यामुळेच त्याचे सिक्स पॅक अॅब्ज कधीच दिसत नाहीत.

दरम्यान, अक्षय सध्या त्याच्या मिशन मंगल या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये अक्षयने राकेश धवन ही भूमिका साकारली असून तो या मोहिमेचे नेतृत्व करताना दिसत आहे. त्याच्याव्यतिरिक्त या टीम तारा शिंदे (विद्या बालन), कृतिका अग्रवाल (तापसी पन्नू), एका गांधी (सोनाक्षी सिन्हा), शर्मन जोशी (परमेश्वर नायडू), नेहा सिद्दिकी (कृति कुल्हारी) नजर हे कलाकार झळकणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This incident during the making of khiladiyon ka khiladi is the reason behind akshay kumar never having six pack abs on screen ssj
Show comments