बॉलिवूड म्हणजे ड्रग्ज, शोषण आणि नेपोटिझमचे गटार आहे अशी टीका अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एकदा केली आहे. खान मंडळींच्या प्रॉडक्शन हाऊससह एकूण ३८ प्रॉडक्शन हाऊसेसनी काही मीडिया हाऊसेसविरोधात कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. त्याविरोधात प्रतिक्रिया देताना कंगनाने बॉलिवूड हे एक ड्रग्ज, शोषण आणि नेपोटिझमचे गटार आहे अशी जळजळीत प्रतिक्रिया कंगनाने दिली आहे. सुशांतच्या आत्महत्येच्या निमित्ताने हे गटार स्वच्छ होतंय तर या लोकांची नेमकी समस्या काय? असाही प्रश्न तिने विचारला आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुम्हा सगळ्यांचं पितळ उघडं पाडत राहणार असाही इशारा कंगनाने दिला आहे. Bullywood the gutter of drugs, exploitation, nepotism and jihad it’s lid is off instead of cleaning this gutter #BollywoodStrikesBack well file a case on me also, till the time I am alive I will continue to expose you all #BollywoodStrikesBack — Kangana Ranaut (@KanganaTeam) October 12, 2020 Big heros not only objectify women but also exploit young girls, they don’t let young men like Sushant Singh Rajput come up, at the age of 50 they want to play school kids, they never stand up for anyone even if people are being wronged before their eyes #BollywoodStrikesBack — Kangana Ranaut (@KanganaTeam) October 12, 2020 Their is an unwritten law in the film industry ‘you hide my dirty secrets I will hide yours’ the only basis of their loyalty to each other. Since I am born I am seeing only these handful of men from the film families run the industry. When will this change? #BollywoodStrikesBack — Kangana Ranaut (@KanganaTeam) October 12, 2020 नाव कमावलेले अभिनेते हे तरुण मुलींचं शोषण करतात. सुशांत सारख्या अभिनेत्यांनी पुढे यावं असं त्यांना मुळीच वाटत नाही. वयाची पन्नाशी गाठली असेल तरीही सिनेमांमध्ये कॉलेज आणि शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भूमिका या बड्या अभिनेत्यांना करायच्या असतात असाही टोला कंगनाने लगावला आहे. सिनेसृष्टीतलं एक रहस्य मी आता उघड करते, तिथे असा अलिखित करार आहे की तू माझी काळी बाजू घाणेरडी बाजू लपव मी तुझी लपवेन. एकमेकांबद्दल आदर राखण्यासाठी फक्त एवढंच केलं जातं. मी लहानपणापासून हेच पाहात आले आहे की काही मूठभर लोकांच्या हातीच सिनेसृष्टीचं सूत्रं आहेत हीच माणसं सिनेसृष्टी चालवतात हे सगळं कधी बदलणार असाही प्रश्न कंगनाने विचारला आहे.