ब्रसेल्समध्ये मार्च महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जेट एअरवेजच्या अधिकारी निधी चाफेकर शुक्रवारी सकाळी मुंबईत परतल्या. त्यांना पुढील उपचारासाठी ब्रिच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ब्रसेल्स हल्ल्यात निधी चाफेकर गंभीर जखमी झाल्या होत्या. गेल्या महिन्याभरापासून त्यांच्यावर बेल्जियम येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मार्चमध्ये त्यांच्या घोट्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. स्फोटात वापरण्यात आलेल्या बॉम्बमधील खिळे त्यांच्या पायात खोल गेल्याने त्यांच्या घोटय़ाजवळील हाडांचे छोटे-छोटे तुकडे झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांना आज मुंबईत आणण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असल्याचे जेट एअरवेजच्या प्रवक्त्याने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brussels attack victim airhostess nidhi chaphekar returns
Show comments