मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या रोखठोक शैलीसाठी ओळखले जातात. राज ठाकरे यांच्यावर बाळासाहेब ठाकरेंचे व्यंगचित्रांचे संस्कार आहेत. एक कुशल राजकारणी म्हणून जसे राज ठाकरे ओळखले जातात तसेच उत्तम व्यंगचित्रकार म्हणूनही. राज ठाकरेंना हिटलर बाबत काय वाटतं? हे त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिटलरबाबत काय म्हणाले राज ठाकरे?

“हिटलर असो किंवा चर्चिल त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोनच पूर्णपणे वेगळा होता. अॅडॉल्फ हिटलरने ज्यूंना ज्या पद्धतीने मारलं त्याचं समर्थन कुणीही करु शकत नाही. जर्मन्सही करत नाहीत, मात्र त्यांनी जी जर्मनी उभी केली त्याला तोड नाही.” राज ठाकरे उदाहरण देत म्हणाले, कौशल्य असलेली माणसं गोळा करण्याचं कसब हिटलरच्या अंगी होतं. जर्मनीत १९२३ मध्ये एका माणसाने टेलरिंगचं दुकान काढलं. १९२९-१९३० च्या आसपास ते दुकान डब्यात गेलं, त्याला बराच तोटा झाला. १९३१ मध्ये त्या टेलरने नाझी पक्ष जॉईन केलं. त्या टेलरची इच्छा होती की त्याला अॅडॉल्फ हिटरलचे कपडे शिवायचे होते. थोडी थोडी ओळख काढत होता. असं करताना एक माणूस त्याला हिटलरकडे घेऊन गेला.”

हिटलरबाबत काय म्हणाले राज ठाकरे?

अॅडॉल्फ हिटलरला टेलर भेटला आणि..

“अॅडॉल्फ हिटलरचा ओव्हरकोट, कॅप, शर्ट, नाझींची प्रतीकं हे सगळं त्या टेलरने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तयार केलं. हिटलरना ते इतकं आवडलं की त्यांनी अख्ख्या सैन्याचं कपडे शिवण्याचं कंत्राट त्या टेलरला दिलं. किती मोठं काम मिळालं असेल कल्पना येते. आजही नाझी पार्टी किंवा त्यांचे सैनिक, अधिकारी यांचे गणवेश आहेत त्या कपड्यांना जगाच्या लष्कर सैन्यांपैकी सर्वात स्टायलिश युनिफॉर्म म्हणतात.” ‘बोल भिडू’ला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी हा किस्सा सांगितला आहे.

हे पण वाचा- ट्रिपल इंजिन सरकारला मनसेच्या चौथ्या इंजिनाची गरज का भासली? राज ठाकरे म्हणाले, “त्यांना माझ्याकडून…”

पुढे राज ठाकरे म्हणाले, “हिटलरचं युग संपलं. तो जो टेलर होता, त्याचं नाव ह्युगो बॉस (Hugo Boss) जो आज इतका मोठा ब्रांड आहे. हिटलरच्या काळात मर्सिडिच कंपनीने स्ट्रेट लिमोझीन ज्याला मराठीत आपण लांबडी गाडी म्हणतो ती तयार केली. हिटलरने उभारलेली संग्रहालयं पाहू शकतो. नंतर अनेक गोष्टी नष्ट झाल्या. युद्धात हरल्याने व्हिलन ठरला. ज्यूंना मारणारा किंवा हाकलून देणारा हिटलर हा शेवटचा माणूस होता. त्याआधी सगळ्या युरोपातल्या सगळ्या देशांनी ज्यूंना त्यांच्या देशाबाहेर काढलं होतं. हिटलर अत्यंत ज्वलंत देशभक्त होता. हिटलरमधल्या चांगल्या गोष्टी आपण कधीही नाकारु शकत नाही.”

हिटरलवरच्या डॉक्युमेंट्रींचा किस्सा

“आजही ऑस्कर मिळालेले चित्रपट बघा. अनेक चित्रपट हे हिटलरच्या भोवती फिरणारे आहेत. हिटलर सोडून त्यांना विचारही करता येत नाही. मी एकदा लंडनला गेलो होतो. तिथे ऑक्स्फोर्ड स्ट्रीटला काही दुकानं होती. पिकाडेलमध्येही एक दुकान होतं. मी तिथे सीडी, डिव्हिडी घ्यायचो. तिथे एके ठिकाणी मी पाहात होतो खूप साऱ्या डॉक्युमेंट्रींच्या रॅक्स होत्या. त्या रॅक्समध्ये ७० टक्के डॉक्युमेंट्रीज या हिटलरवर होत्या. कुठे? तर इंग्लंडमध्ये. मी त्या माणसाकडे चौकशी केली, तेव्हा त्याने मला सांगितलं सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या डॉक्युमेंट्री या हिटलरवरच्याच आहेत.” असा किस्सा राज ठाकरेंनी सांगितला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns chief raj thackeray said hitler is great patriot his good things will always there scj