बुलढाणा : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बुलढाणा विधानसभा मतदारसंघासाठी ५१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पुरवणी अर्थसंकल्पात तब्बल ५१ कोटींची विकास कामे मंजूर करून घेतली आहे. यातून बुलढाण्यात न्यायाधीशांची निवासस्थाने, पूल व रस्त्यांची कामे होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – बुलढाणा : चाळीस हजारांची लाच स्वीकारताना लिपिक जाळ्यात

हेही वाचा – अमरावती : उत्पादन घट तरीही सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा कमी, शेतकऱ्यांची चिंता वाढली

बुलढाण्यात दिवाणी न्यायाधीश व मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्याकरिता निवासस्थाने उभारण्याची मागणी त्यांनी केली केली. सदर निवासस्थानासाठी त्यांनी ७.८६ कोटी रुपयाच्या निधीची मागणी केली. सार्वजनिक बांधकाम उपविभाग बुलढाणाअंतर्गत सदर कामास मंजुरी मिळाली आहे. तसेच मोताळा तालुक्यातील राजुर गुळभेली रस्त्यावरील पुलाच्या कामासाठी ३ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. उर्वरित निधीतून मतदारसंघात रस्त्यांचे जाळे विणण्यात येणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 51 crore fund for buldhana constituency residences of judges road works will be speeded up scm 61 ssb