पिंपरी : चिंचवडमधील तळवडे या ठिकाणी एका कारखान्यात लागलेल्या आगीमध्ये सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. केकवरील स्पार्कल कँडल बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली. त्यानंतर कारखान्यात स्फोट झाले. घटनास्थळी अग्निशमन दलाची वाहने पोहोचली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : अट्टल घरफोड्या करणाऱ्या मुंबईच्या सराईत गुन्हेगारांना वाकड पोलिसांनी ठोकल्या बेड्या, २४ घरफोड्या केल्याचं निष्पन्न

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी तीनच्या सुमारास तळवडे या ठिकाणी भीषण आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अद्याप मृतांची ओळख पटली नाही. घटनास्थळी चिखली आणि देहूरोड पोलीस त्याचबरोबर अग्निशमन दलाचे वाहने पोहोचली. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून फायर कँडल कंपनी जळून खाक झाली आहे. यात काही जण अडकले असून बचावकार्य सुरू आहे. मृत आणि जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, या कारखान्याला उत्पादन करण्यासाठी पोलिस व प्रशासनाकडून कोणतीच परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे मालक व चालक दोघांवरही गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आग लागली त्यावेळी १५ ते २० कामगार कारखान्यात काम करत होते, याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पिंपरी- चिंचवडमधील आगीतील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची आर्थिक मदत

पिंपरी- चिंचवडमधील तळवडे येथील स्पार्कल कँडल बनवणाऱ्या कारखान्याच्या आग दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. दुर्घटनेतील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri chinchwad 6 died in fire break out at cake candle company in talwade area kjp 91 css