पिंपरी : पवना धरण येथे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रावेत बंधाऱ्यात कमी प्रमाणात पाणी सोडल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी सायंकाळी विस्कळीत झाला. शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने, विस्कळीत राहणार आहे.

हेही वाचा – पिंपरी : मावळच्या जागेवरून महायुतीत पेच? राष्ट्रवादीच्या आमदारांनंतर आता ‘या’ बड्या नेत्याचाही मावळवर दावा

हेही वाचा – पिंपरी : लोकसभा निवडणुकीची तयारी; पोलीस आयुक्तांकडून मतदान केंद्रांची पाहणी

मावळातील पवना धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. पवना नदीतून रावेत बंधारा येथे अशुद्ध जलउपसा केला जातो. निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यावर प्रक्रिया केली जाते. तेथून सर्व शहराला पाणीपुरवठा केला जातो. पवना धरण येथे तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे रावेत बंधारा येथे कमी प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे गुरुवारी सायंकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. तसेच शुक्रवारी सकाळचाही पाणीपुरवठा कमी दाबाने व विस्कळीत राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.