कडक उन्हाळा सुरु झाला आहे आणि बाजारात कैरी सहज उपलब्ध होऊ लागल्या आहेत. त्यामुळे अनेकांच्या घरात कैरीचा आता अनेक पदार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वापर सुरु झालाय. अनेकांना मीठ, मसाला लावून कैरी खायला आवडते. तर काहीजण मोठ्याप्रमाणात कैऱ्या उपलब्ध असतील तर त्यापासून लोणचं, मुरांबा, आमसूल अशा गोष्टी बनवून ठेवतात. पण आज आम्ही तुम्हाला कैरीपासून तयार होणारा एक चटपटीत पदार्थ सांगणार आहोत. जो तुम्ही अगदी पोळी भाकरी, खिचडी भाताबरोबर आवडीने खाऊ शकता. आज आपण कैरीपासून चटपटीत आंबट गोड कढी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत…

साहित्य

२ कैऱ्या
२ चमचे गुळ
१ चमचा चण्याचं पीठ
पाणी
चिमूटभर मेथी, मोहरी
१०, १२ कढीपत्त्याची पानं
२ हिरव्या मिरच्या
अर्धा चमचा हिंग
१ छोटा चमचा हळद
चवीनुसार मीठ
कोथिंबीर

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Summer special recipe kairichi aamti kadhi how to make karichi kadhi recipe in marathi sjr
First published on: 03-04-2024 at 01:34 IST