विदर्भानंही स्वत:ची खाद्यसंस्कृती जपलीय.विदर्भीय लोक जेवणाच्या बाबतीत अतिशय आग्रही, बिनधास्त, बेधडक, एक रांगडा व्यक्तिमत्वाचे येथील लोक येणाऱ्या जाणाऱ्याशी सहज ओळख करून घेत. विदर्भातले जेवण” म्हणजे जहाल तिखटच, असं कित्येकांना वाटतं.’.. पण तसं नाही, काही विशिष्ट वर्गातले लोक तिखट खातात.विदर्भात मस्त झणझणीत तर्री वाल्या भाज्यांची क्रेझच आहे,सगळ्यांनाच या मस्त झणझणीत भाज्या आवडतात,,,त्यातल्या त्यात तर सिझनल ढेमसाची झणझणीत भाजी म्हणजे क्या बात.. चला तर मग पाहुयात चमचमीत आणि तितकाच चवदार पदार्थ खास विदर्भ स्पेशल ढेमसाची झणझणीत भाजी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झणझणीत मसाला ढेमसे साहित्य

  • ७-८ ढेमसे
  • ४ कांदे बारीक चिरुन
  • १ वाटी सुके खोबरे किसुन
  • २ मोठे कांदे
  • १ टोमॅटो
  • २ चमचे खसखस
  • तिखट चवीनुसार
  • १/२ चमचा हळद
  • २ चमचे डाळवे
  • तुकडे काजुचे बारीक
  • ८,१० कीसमीस
  • १ चमचा वर्हाडी मसाला
  • १ चमचा धणेपुड
  • मीठ चवीनुसार
  • ५-७ लवंग,मीरे
  • तेल आवश्यकतेनुसार
  • अद्रक,लसूण
  • कोथिंबीर

झणझणीत मसाला ढेमसे कृती

स्टेप १
प्रथम ढेमसे स्वच्छ धुवुन त्याला वरील बाजुने कापुन आतुन बिया काढुन पोखरुन घ्या.आणि गरम पाण्यात त्यांना आठ,दहा मिनीट वाफवुन घ्या.

स्टेप २
आता या मधे भरण्याचा मसाला करुन घेउ,त्यासाठी एका पॅन मधे बारीक चिरलेला कांदा परतुन घ्या. मग त्यात खोबर्याचा किस घालुन परता.मग हळद,तिखट,धणेपुड,एक चमचा खसखस,काजु,किसमीस घालुन आणि चवीनुसार मीठ घालुन मसाला परतुन घ्या.गार होउ द्या.मसाला वाफवलेल्या ढेमसांमधे भरुन घ्या.

स्टेप ३
आता याच्या ग्रेव्हीचा मसाला करुन घ्या.त्यासाठी दोन कांदे,टोमॅटो,लवंग,मीरे,आले लसुण,खसखस सगळे छान तेलात परतुन याचा मसाला वाटुन घ्या.

स्टेप ४
आता कढईत तेल गरम करुन या मधे वाटलेला मसाला छान तेल सुटेपर्यंत परतुन घ्या.या मधे हळद,तिखट,वर्हाडी मसाला,गरम मसाला घालुन छान परता.व मग भरलेले ढेमसे घालुन पाच,सात मिनीट शिजु द्या.

स्टेप ५
आता या मधे आवश्यक तेवढे पाणी घालुन रस्सा करुन घ्या.चवीनुसार मीठ घाला,उकळी येउ द्या.गरम गरम मसाला ढेमसे तयार आहेत.वरुन कोथिंबीर घाला.

हेही वाचा >> खानदेशी कढई खिचडी; रात्रीच्या जेवणाला करा झणझणीत बेत, ही घ्या सोपी रेसिपी

स्टेप ६
मस्त झणझणीत मसाला ढेमसे पराठ्यांबरोबर सर्व्ह करा.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidarbha special recipe masala dhemse bhaji recipe in marathi srk