Premium

व्यक्तिवेध : एडिथ ग्रॉसमन

गॅब्रिएल गार्सिआ मार्खेजची ‘वन हण्ड्रेड इयर्स ऑफ सॉलिटय़ूड’ ही कादंबरी ग्रेगरी रबासा यांनी अनुवादित केल्यामुळे १९७० मध्ये इंग्रजीत आली; तोवर एडिथ ग्रॉसमन यांनी स्पॅनिश साहित्यात पीएच.डी. मिळवून अमेरिकेतच कुठे तरी प्राध्यापक वगैरे होण्याची तयारी सुरू केली होती.

edith grossman
व्यक्तिवेध : एडिथ ग्रॉसमन

गॅब्रिएल गार्सिआ मार्खेजची ‘वन हण्ड्रेड इयर्स ऑफ सॉलिटय़ूड’ ही कादंबरी ग्रेगरी रबासा यांनी अनुवादित केल्यामुळे १९७० मध्ये इंग्रजीत आली; तोवर एडिथ ग्रॉसमन यांनी स्पॅनिश साहित्यात पीएच.डी. मिळवून अमेरिकेतच कुठे तरी प्राध्यापक वगैरे होण्याची तयारी सुरू केली होती. पण पीएच.डी.साठी चिले देशातला बंडखोर स्पॅनिश कवी निकानोर पारा याचा केलेला विशेष अभ्यास, त्यानिमित्ताने पारा यांच्या कवितांचे केलेले अनुवाद आणि फुलब्राइट शिष्यवृत्तीवर स्पेनला गेल्या असता इंग्रजी आणि स्पॅनिश साहित्याच्या वाचकांच्यात असलेल्या तफावतीची जाणीव एवढे भांडवल एडिथ यांच्याकडे तेव्हाही होते. १९७२ मध्ये त्यांना अर्जेटिनातील लेखक मॅसिडोनिओ फर्नाडिस यांच्या एका कथेच्या अनुवादाचे काम मिळाले. नुकताच लष्करशाहीच्या कब्जात गेलेला अर्जेटिनाही त्यानिमित्ताने एडिथ यांनी अभ्यासला. त्यानंतर अनेक अनुवाद-कामे मिळू लागलीच, पण मूळच्या अभ्यासू असलेल्या एडिथ यांनी अनुवाद व अनुवादकाचे कार्य याबाबत काहीएक भूमिका मांडणे सुरू केले. तब्बल ६० स्पॅनिश साहित्यकृती त्यांनी रसरशीतपणे इंग्रजीत आणल्याच; पण परवाच्या ४ सप्टेंबरला त्यांची निधनवार्ता आल्यानंतर जगाने आठवण काढली ती-  ‘अनुवादकाचे नाव मुखपृष्ठावरच हवे’ हा एडिथ यांचा आग्रह नसता तर अनुवादक दुय्यमच मानले गेले असते, याचीही!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मार्खेजची ‘लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरा’ ही कादंबरी १९८५ मध्ये आली; तोवर अनुवादक म्हणून एडिथ ग्रॉसमन यांचेही नाव बऱ्यापैकी माहीत झाले होते. ‘लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरा’च्या अनुवादाचे काम करण्यापूर्वी मार्खेजचा ‘आवाज’ – त्याचा लेखकीय सूर – कसा असावा, याचा अभ्यास एडिथबाईंनी केला आणि १९८७ मध्ये पुस्तक इंग्रजीत आले. मग मार्खेजच्या पुढल्या सर्वच कादंबऱ्या त्यांच्याकडेच आल्या. ‘माझा इंग्रजीतला आवाज तुम्हीच,’ अशी दाद मार्खेजकडून मिळाली. पण एडिथबाई तेवढय़ाने हुरळून नसतील गेल्या.. कारण स्पॅनिश साहित्यातले अनेक निरनिराळे आवाज इंग्रजीत कसे आणायचे, हा त्यांच्यासाठी जणू आत्मशोधाचा भाग होता! तसे नसते, तर मार्खेजप्रमाणेच मारिओ व्हर्गास योसा यांच्या ‘द फीस्ट ऑफ द गोट’, ‘नेबरहुड’ आदी कादंबऱ्यांचे अनुवाद, इसाबेल अलेन्दे, योसे लिमा, लुई सान्चेझ, यूलिओ कोर्ताझार यांच्या कादंबऱ्यांची इंग्रजीकरणे.. काही स्पॅनिश कवितांचेही अनुवाद, यांसाठी त्या ओळखल्या गेल्या नसत्या.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vaykivedh edith grossman holds a ph d in spanish literature professor ysh

First published on: 11-09-2023 at 01:25 IST
Next Story
चिंतनधारा : आपली आपण करा सोडवण..