Premium

युजर्सची मजा! ‘या’ प्लॅन्समध्ये मोफत मिळतंय Netflix सबस्क्रिप्शन, लगेच पाहा जिओ एअरटेलचे ‘हे’ भन्नाट आॅफर

मोबाईलच्या रिचार्जसॊबत नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन मोफत हवंय? मग एअरटेल आणि जिओच्या मोबाईल रिचार्जसोबत मिळणाऱ्या मोफत व्हिडीओ स्ट्रीमिंगचे काय प्लॅन्स आहेत पाहा.

Airtel and Jio's prepaid plans with free Netflix subscription
जिओ, एअरटेलच्या या भन्नाट ऑफरसह नेटफ्लिक्स सब्स्क्रिप्शन मोफत मिळवा. [photo credit – Indian express]

सध्या ओटीटी माध्यमांना प्रचंड मागणी असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे बरेचजण फोन रिचार्जसोबत, नेटफ्लिक्ससारख्या माध्यमांचे मोफत सबस्क्रिप्शन कुठे मिळत आहे का याच्या शोधात असतात. काही काळापूर्वी, वोडाफोनसारखे दूरसंचार माध्यम, प्रीपेड प्लॅनसोबत नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन मोफत देत होती परंतु, काही कारणांमुळे त्यांनी ही सेवा थांबवली असून. त्यांनी ही सेवा का थांबवली याचे कारण अद्याप माहीत नाही. परंतु तरीही तुम्हाला, प्रीपेड रिचार्जसोबत नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन मोफत हवे असल्यास, एअरटेल आणि जिओ यांसारख्या कंपन्यांचा पर्याय उपलब्ध आहे. असे इंडियन एक्स्प्रेसच्या माहितीवरून समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिलायन्स जिओ

सध्या रिलायन्स जिओकडे मोबाईल रिचार्जसोबत मोफत नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनचा बेसिक प्लॅन्स उपलब्ध आहेत. यांपैकी सर्वात स्वस्त मोबाईल रिजार्च आणि मोफत नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन प्लॅनमध्ये तुम्हाला ८४ दिवसांसाठी, दिवसाला २ जीबी डेटा मिळणार असून या प्लॅनची किंमत १,०९९ रुपये इतकी आहे. त्याचसोबत इतर प्लॅन्सप्रमाणे, यातही तुम्हाला अमर्यादित फोन कॉल्स आणि दिवसाला १०० एसेमेस मिळतील.

हेही वाचा : बिल भरताना किमतीऐवजी भरला फोन नंबर!! अमेरिकेतील महिलेची रिफंडसाठी धाव; नेमके प्रकरण काय आहे पाहा…

तुम्हाला याहून अधिक मोठा प्लॅन हवा असल्यास, तुम्ही दुसऱ्या प्लॅनची निवड करू शकता. या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित फोन कॉल्स, दिवसाला १०० एसेमेस आणि ३ जीबी डेटा पॅक मिळणार असून, हा प्लॅन केवळ १,४९९ रुपयांना उपलब्ध आहे.

यासोबतच, जिओच्या इतर प्लॅन्सप्रमाणे तुम्हाला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडचादेखील लाभ घेता येईल.

एअरटेल

एअरटेलकडे मोफत बेसिक नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनचा केवळ एक प्लॅन उपलब्ध असून; यामध्ये तुम्हाला ८४ दिवसांसाठी, दिवसाला ३ जीबी मोबाईल डेटा मिळणार आहे. सोबत अमर्यादित फोन कॉल्स आणि दिवसाला १०० एसेमस करता येतील. त्याचबरोबर तुम्हाला ३ महिन्यांसाठी अपोलो २४/७ सर्कल, मोफत हॅलोट्यून्स आणि विंक म्युझिक [Wynk Music] सारख्या इतर माध्यमांचा देखील लाभ घेता येणार आहे. या प्लॅनची किंमत केवळ १,४९९ रुपये इतकी आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Get free netflix subscription with airtel and jio prepaid plans check out the details dha

First published on: 27-11-2023 at 14:49 IST
Next Story
कोणताही ॲप डाउनलोड न करता ‘या’ प्लॅटफॉर्मवर लुटा गेम्सचा आनंद !