व्हॉट्सअॅपवर आपण केलेला मेसेज समोरच्याने पाहिला आहे की नाही हे व्हॉट्सअपच्या ‘ब्ल्यू टिक्स’ फीचरमुळे समजते. हे फीचर सोईचे असले तरीही कधी कधी ते अनेकांना नकोसे वाटू शकते. कारण- आपण मेसेज वाचूनदेखील त्यावर रिप्लाय दिला नाही, तर समोरच्या व्यक्तीला वाईट वाटू शकते किंवा एखाद्याच्या मनात गैरसमज निर्माण होऊ शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र, अनेकदा असे आपल्याकडून चुकून होऊ शकते. तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामात असताना आलेला मेसेज वाचता आणि नंतर त्यावर उत्तर देऊ म्हणून फोन बाजूला ठेवून देता. मात्र, या मधल्या वेळेत समोरच्या व्यक्तीकडे तुम्ही दुर्लक्ष करीत आहात, असे अगदी सहजपणे त्या व्यक्तीला वाटू शकते. परंतु, या ब्ल्यू टिक्स बंद करायच्या असतील, तर तसे तुम्हाला करता येऊ शकते. ते कसे करायचे ते पाहू.

हेही वाचा : Car tips : नवीन गाडी घेतल्यावर ‘या’ चुका करू नका! वाहनाची काळजी कशी घ्यावी पाहा

व्हॉट्सअप टिक्स

जेव्हा आपण एखाद्याला मेसेज पाठवतो तेव्हा तो सेंड झाला असल्याची माहिती देण्यासाठी ग्रे रंगाची सिंगल टिक येते.
मेसेज समोरच्याला मिळाला असल्याची म्हणजेच मेसेज डिलिव्हरी झाल्याची माहिती देण्यासाठी ग्रे रंगाच्या दोन टिक्स आपल्याला दिसतात.
तर समोरच्या व्यक्तीला पोहोचलेला मेसेज त्याने वाचला आहे याची माहिती आपल्या दोन ब्ल्यू टिक्सद्वारे मिळते.

व्हॉट्सअपवर ब्ल्यू टिक्स बंद कशा करायच्या?

ॲण्ड्रॉइड आणि ISO या दोन्हींसाठी पुढील स्टेप्सचे पालन करा.

सर्वप्रथम व्हॉट्सॲप चालू करावे.
त्यानंतर स्क्रीनवर उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या तीन डॉट्सवर क्लिक करा.
आता सेटिंगमध्ये जाऊन प्रायव्हसी या पर्यायावर क्लिक करा.
तुम्हाला तिथे ‘read receipts’ असा पर्याय दिसेल.
त्यावर क्लिक करून तुमच्या ब्ल्यू टिक्स म्हणजेच read receipts बंद करू शकता.
तुम्हाला हवे तेव्हा या ब्ल्यू टिक्स पुन्हा सुरू करू शकता.

हेही वाचा : Amazfit Active स्मार्टवॉच भारतात लाँच! विकत घेण्याआधी किंमत अन् फीचर जाणून घ्या…

व्हॉट्सअपवर ब्ल्यू टिक्स बंद करण्याचे इतर पर्याय पाहा

व्हॉट्सअपवर ब्ल्यू टिक्स कायमच्या बंद करायच्या नसल्यास काय करावे ते बघा.

१. एरोप्लेन मोड

तुम्हाला जर व्हॉट्सॲपचे मेसेज वाचायचे असल्यास एरोप्लेन मोड सुरू करा आणि मेसेजेस वाचा. असे केल्याने तुम्ही मेसेज वाचला आहे ते समोरच्याला समजणार नाही. मात्र, तुम्ही जेव्हा एरोप्लेन मोड बंद कराल तेव्हा चॅट्समध्ये ब्ल्यू टिक्स दिसतील.

२. नोटिफिकेशन

कोणतेही मेसेज आले तरी आपल्याला त्याचे नोटिफिकेशन दिसतात. त्यामुळे आलेले मेसेज तुम्ही नोटिफिकेशनमधून सहज वाचू शकता आणि तो मेसेज वाचल्याच्या टिक्स समोरच्याला दिसणार नाहीत.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to turn off whatsapp read receipts on android and ios check out step by step process dha
First published on: 13-02-2024 at 17:11 IST