OnePlus ही एक मोबाईल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन फीचर्स असलेले स्मार्टफोन्स लाँन्च करत असते. OnePlus कंपनीने आज रात्री एक मोठा लाँचिंग इव्हेंट आयोजित केला आहे. या इव्हेंटमध्ये स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही आणि वायरलेस इअरबड्ससह अनेक उत्पादने लाँन्च करण्यात येणार आहेत. या इव्हेंटमध्ये OnePlus 11 हे सर्वात मोठे लाँचिंग असल्याचे सांगितले जात आहे. अनेक दिवसांपासून वापरकर्ते या स्मार्टफोनची वाट बघत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वनप्लस कंपनीने वनप्लस ११ बद्दल याआधीच बरीचशी माहिती उघड केली आहे. तसेच या इव्हेंटमध्ये OnePlus 11R आणि OnePlus Pad देखील लॉन्च करण्यात येतील असे कंपनीने सांगितले. यामध्ये ६५ इंचाचा स्मार्ट टीव्ही आणि OnePlus Buds Pro 2 लॉन्च केले जाणार आहेत.

हेही वाचा : OnePlus 11R 5G स्मार्टफोनचे फीचर्स झाले लीक; कंपनीने लाँचिंगची तारीख केली जाहीर

काय आहे OnePlus च्या इव्हेन्टची वेळ

OnePlus Cloud 11 हा लॉन्चिंग इव्हेंट आज (मंगळवार) संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहे. हा इव्हेंट तुम्ही OnePlus च्या YouTube चॅनलव कंपनीच्या अधिकृत वेबसाईट, ट्विटर आणि इतर सोशल मीडिया हॅन्डल्सवर पाहू शकणार आहात.

OnePlus 11

या स्मार्टफोनमध्ये थर्ड जनरेशनचा हॅसलब्लॅड कॅमेरा असणार आहे. तसेच मागील बाजूस तत्तरिप्ल रियर कॅमेरा सिस्टीम असणार आहे. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 हा प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच वल्प्ल्स ११ या स्मार्टफोनमध्ये १६ जीबी इतकी LPDDR5X रॅम देण्यात आली आहे. वापरकर्ते हा फोन टायटन ब्लॅक आणि इटरनल ग्रीन या दोन रंगांमध्ये खरेदी करू शकतात.

OnePlus Buds Pro 2

हे इअरबड्स Dynaudio च्या मदतीने तयार करण्यात आले आहेत. इअरबड्सच्या आतमध्ये MelodyBoostTM ड्युअल ड्रायव्हर्स आहेत ते Dynaudio ने तयार करण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे. हे इअरबड्स वापरकर्ते आर्बर ग्रीन आणि ऑब्सिडियन ब्लॅक रंगांमध्ये खरेदी करू शकणार आहेत.

हेही वाचा : Bard Google: ChatGpt चं टेन्शन वाढलं, गुगल लवकरच लॉन्च करणार ‘बार्ड’

OnePlus Pad

OnePlus आज वनप्लस पॅड लॉन्च करणार आहे. जो भारतातील कंपनीचा पहिला टॅबलेट आहे. याचे डिझाईन हे एर्गोनॉमिकनुसार तयार करण्यात आले आहे. याची रचना ही उत्कृष्ट आहे असा कंपनीने दावा केला आहे. वनप्लस पॅड हॅलो ग्रीन कलर या रंगांमध्ये वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oneplus 11 and other products will launched at e event of oneplus company tmb 01
First published on: 07-02-2023 at 13:41 IST