रिअलमी (Realme) ही एक लोकप्रिय मोबाइल कंपनी आहे, जी आज भारतात P सीरिज लाँच करणार आहे. या नवीन सीरिजमध्ये दोन स्मार्टफोन्सचा समावेश आहे; ज्यामध्ये रिअलमी पी (Realme P1) आणि रिअलमी पी १ प्रो (Realme P1 Pro) यांचा समावेश आहे. २२ एप्रिल रोजी म्हणजेच आज या स्मार्टफोन्सची पहिली विक्री होणार आहे. ग्राहक रिअलमी P1 5G आणि रिअलमी P1 Pro 5G स्मार्टफोनच्या पहिल्या विक्रीदरम्यान अनेक बँक ऑफर्स, डील्सचा लाभ घेऊ शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फीचर्स –

रिअलमी P1 आणि P1 Pro स्मार्टफोनमध्ये १२० एचझेड AMOLED डिस्प्ले, मीडिया टेक Dimensity ७०५० चिपसेट, ५,००० एमएएच बॅटरी, स्नॅपड्रॅगॉन ६ जेन १ 5G चिपसेट, ५० एमपी सोनी एलव्हायटी – ६०० कॅमेरा, २४० एचझेड टच सॅम्पलिंग रेट आणि डोळ्यांच्या सुरक्षेसाठी TUV राईनलँडने प्रमाणित केलेला आहे. विशेष म्हणजे हे रेनवॉटर टचला सपोर्ट करते व पाण्याच्या नुकसानापासून स्क्रीनचे संरक्षण करते. डिव्हाइसेस Android 14 OS वर चालतात; ज्यामध्ये रिअलमी दोन वर्षांचे Android OS अपग्रेड आणि तीन वर्षांचे सुरक्षा पॅच प्रदान करते.

हेही वाचा…२० हजारांपेक्षा कमी किमतीत सॅमसंगचा ट्रिपल कॅमेरा सेटअपचा स्मार्टफोन; बॅटरी लाईफ बघून म्हणाल ‘डील Done’

रिअलमी P1 and P1 Pro बँक ऑफर्स –

रिअलमी P1 5G ची पहिली विक्री आज २२ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता सुरू झाली आहे. यानंतर संध्याकाळी ६ वाजता रिअलमी P1 Pro 5G साठी Red Limited सेल सुरू होईल, जो रात्री ८ वाजेपर्यंत दोन तास चालेल. या दोन्ही स्मार्टफोन्सच्या विक्री realme.com आणि Flipkart वर होतील.

१. दोन्ही स्मार्टफोन्ससाठी बँक ऑफर जाहीर केल्या आहेत. यामध्ये रिअलमी P1 5G च्या पहिल्या विक्रीसाठी, ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी व्हेरिएंटसाठी एक हजार रुपयांची सवलत आणि ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी व्हेरिएंटवर दोन हजार रुपयांची सूट ग्राहकांना देण्यात येणार आहे.

२. रिअलमी P1 Pro 5G साठी Red Limited सेलदरम्यान ग्राहकांना realme.com आणि Flipkart वर तीन महिन्यांसाठी नो ईएमआय कॉस्टवर दोन हजार रुपयांपर्यंतच्या बँक ऑफर मिळू शकतात.

३. रिअलमी P1 Pro दोन कॉन्फिगरेशनमध्ये येतो: ८जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २१,९९९ रुपये आहे आणि ८जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २२,९९९ रुपये आहे; तर बँक ऑफर जोडल्यास या बेस मॉडेलची किंमत १९,९९९ रुपये आणि टॉप-एंड मॉडेलची किंमत २०,९९९ रुपयांपर्यंत घसरू शकते.

४. रिअलमी P1 च्या ८जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज वेरिएंटची पहिल्या विक्रीदरम्यान किंमत १५,९९९ रुपये आहे आणि २५६ जीबी स्टोरेजसह ८ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत १८,९९९ रुपये आहे. विक्री ऑफरसह, रिअलमी P1 ची किंमत १५,९९९ रुपये राहील, तर दुसरा व्हेरिएंट १६,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध असेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Realme p1 realme p1 pro smartphones will be available for purchase with bank offers discounts and more asp
Show comments