एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यावर आपण अनेक सोशल मीडिया ॲपवर फोटो, रील किंवा एखादी स्टोरी शेअर करतो. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर ॲपवर तर आपल्या सगळ्यांना स्टोरी शेअर करता येते. पण, व्हॉट्सॲपवर फोटो अपलोड करण्यासाठी ‘स्टेटस अपडेट’ हा पर्याय असतो. तसेच इन्स्टाग्राम ॲपवर एखादा ग्रुप फोटो अपलोड करताना ग्रुपमधील एखादी व्यक्ती फोटो किंवा व्हिडीओ स्टोरीवर अपलोड करते आणि मित्र-मैत्रिणींसह कुटुंबातील इतर सदस्यांनासुद्धा टॅग किंवा मेन्शन करते. तर असे केल्याने ती स्टोरी टॅग केलेल्या त्या प्रत्येक व्यक्तीला ‘ॲड टू मेन्शन’ करून, स्वतःच्या स्टोरीवर अपलोड करता येते. तर आता असेच काहीस फीचर व्हॉट्सअ‍ॅपमध्येसुद्धा युजर्सना दिले जाणार आहे.

व्हॉट्सॲपच्या या नवीन फीचरची चाचणी अद्याप सुरू आहे; जी युजर्सना त्यांचा स्टेटस अपलोड करताना अगदी इन्स्टाग्रामप्रमाणे खासगीरीत्या इतरांना मेन्शन करण्याची परवानगी देणार आहे. WABetaInfo च्या अहवालानुसार, नवीन फीचर वापरकर्त्यांना स्टेटस अपडेटमध्ये निवडक संपर्कांना थेट टॅग करण्यास अनुमती देईल. असे केल्यास टॅग केलेल्या संपर्कांना नोटिफिकेशन जाईल. त्यामुळे एक गोष्ट नक्की होईल की, युजर्सना थेट अपडेट्स मिळत राहतील आणि त्यांच्यातील संवाद सुधारेल. त्यामुळे युजर्सचा एक्स्पीरियन्सदेखील अनेक पटींनी वाढेल.

हेही वाचा…AI फीचर्ससह सॅमसंगचे ‘हे’ दोन टीव्ही भारतात लाँच; सेटअप बॉक्स लावण्याचीही गरज नाही; किंमत फक्त…

तसेच हे फीचर तुम्ही मेन्शन केलेल्या युजरव्यतिरिक्त कोणालाही दिसणार नाही. तसेच जर तुम्ही एखाद्या युजरने स्टेटस अपडेट म्युट (Mute) केला असेल, तर त्या व्यक्तीला तुम्ही टॅग किंवा मेन्शन करू शकणार नाही आणि त्यांच्यापर्यंत नोटिफिकेशनसुद्धा पोहोचणार नाही. युजर्सना काही खासगी क्षण निवडक लोकांबरोबर शेअर करायचे असल्यास हे फीचर त्यांना खरेच उपयोगी पडेल. संपर्काचा खासगीरीत्या स्टेटस अपडेट्समध्ये मेन्शन करण्याच्या या खास फीचरमुळे वापरकर्त्यांमध्ये लक्षणीय वाढ होण्याची कंपनीची अपेक्षा आहे. तर आता लवकरच युजर्स आपल्या आवडीच्या कॉन्टॅक्टला आपले स्टेटस दाखवण्यासाठी त्यांना मेन्शन करू शकतील. त्यामुळे कॉन्टॅक्टला स्टेटस अपलोड झाल्यानंतर लगेच नोटिफिकेशन मिळेल.