Viral Video: रस्त्यावर अनेक भटके प्राणी फिरत असतात. कधी कधी हे प्राणी येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांवर हल्ला करतात तर कधी मानवी वस्तीत शिरकाव करतात. त्यामुळे भटक्या प्राण्यांविषयी लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. नुकताच सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका भटका बैल थेट दुकानात शिरला आहे.

मोबाइल दुरुस्तीच्या दुकानात दोन व्यक्ती (कर्मचारी) काम करत आहेत. एक ग्राहक सुद्धा मोबाइल दुरुस्तीच्या दुकानात त्याची समस्या घेऊन आला आहे. बघता बघता ग्राहक मागे वळून बघतो आणि अचानक एक बैल दुकानात उडी मारतो. नंतर कामगार बैलाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पुढे काय घडलं हे तुम्हीसुद्धा व्हायरल व्हिडीओतून बघा.

हेही वाचा…उन्हापासून संरक्षणासाठी बनविला चालता-फिरता Cooler; तीन चाके लावली अन्… पाहा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना रेकॉर्ड झाली आहे. मोबाइल दुरुस्तीच्या दुकानात अचानक बैल उडी घेतो ; जिथे दोन कर्मचारी काम करत असतात.बैल दुकानात आक्रमकपणे पुढे-मागे फिरतो दुकानात असणारी यंत्रसामग्री आणि इतर उपकरणे पाडून टाकतो. बहुदा त्या ठिकाणाहून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना बैल दिसत आहे.

ही घटना दिल्लीच्या संगम विहारमध्ये घडली आहे. संगम विहारचा परिसर हा दाट लोकवस्तीचा परिसर आहे ; जो असोला वन्यजीव अभयारण्याजवळ आहे.सोशल मीडियावर हा व्हिडीओ @chiragbarjatyaa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून प्राण्यांच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करताना दिसून आले आहेत.