Viral Video: कडाक्याच्या उन्हात घराबाहेर निघणेही नकोसे वाटते. सतत तहान लागणे, अंगातून मोठ्या प्रमाणात घाम निघणे आदी गोष्टी उन्हाळ्यात प्रत्येकालाच जाणवतात. त्यावर उपाय म्हणून अनेक जण स्कार्फ, चष्मा, टोपी यांचा उपयोग करतात. तर उन्हापासून स्वतःचे संरक्षण व्हावे म्हणून एका व्यक्तीने स्ट्रीट कूलरचा शोध लावला आहे. आता तुम्ही म्हणाल की, स्ट्रीट कूलर म्हणजे काय ? तर एका तरुणाने जुगाड करून रस्त्यावर चालणारा तीन चाकांचा कूलर बनविला आहे.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, स्ट्रीट कूलर बनविण्यासाठी व्यक्तीने एका बॉक्सला तीन चाके लावली आहेत आणि अगदी कूलरप्रमाणे त्याची रचना करून घेतली आहे. पण, मजेशीर गोष्ट अशी की, या स्ट्रीट कूलरमध्ये बसण्याचीदेखील व्यवस्था त्याने केली आहे आणि आतमध्ये बसून हे स्ट्रीट कूलर चालवलेसुद्धा जात आहे. एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडीओ.

हेही वाचा…गाडीचा फुटला आरसा, चालकाने केला असा जुगाड की VIDEO पाहून पोट धरून हसाल

व्हिडीओ नक्की बघा …

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, रहदारीच्या रस्त्यावर अनेक गाड्या ये-जा करीत आहेत. पण, एका खास वाहनाने सर्वांच लक्ष वेधून घेतले आहे. एक निळ्या रंगाचा कूलर रस्त्यावर धावतो आहे. एखादी रिक्षा रस्त्यावर धावते अगदी त्याचप्रमाणे हा कूलर रस्त्यावर धावताना दिसून आला आहे. रस्त्यावरील नागरिकसुद्धा या अनोख्या कूलरला पाहून आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @imran_soyla या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा जुगाड पाहून पोट धरून हसत आहेत. तर अनेक मजेशीर कमेंट व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत. भारतात कोणत्याही प्रकारचा जुगाड केला जाऊ शकतो हे या व्हिडीओतून पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे. याआधीसुद्धा स्वयंपाकघरात थंडगार हवेसाठी टेबलावर एका व्यक्तीने फॅन ठेवून, तो चिकटपट्टीने लावून, स्वतःच्या पाठीवर ठेवला होता. तर आता कडाक्याच्या उन्हात चालताना थंडगार वाटावे म्हणून या व्यक्तीने हा स्ट्रीट कूलरचा जुगाड केला आहे.