आयुष्यात कष्ट कोणाला चुकले आहेत. श्रीमंत असो की गरीब कष्ट सर्वांनाच करावे लागेल. कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही. प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो. सध्या अशाच एका कष्ट करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक डिलिव्हरी बॉय ऑर्डरची वाट पाहत रस्त्याच्या कडेला दुचाकीवर झोपला आहे असे दिसते. भर उन्हात शांतपणे झोपलेल्या व्यक्तीचा व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

डिलिव्हरी बॉयचे काम वाटते तितके सोपे नाही. कधी एका पाठोपाठ ऑर्डर मिळतात. वाहतूक कोंडीतून मार्ग काढावा लागतो, वेळेशी स्पर्धा करत दिलेली ऑर्डर वेळेत पोहचवावी लागते आहे. अनेकदा त्यांना जेवायलाही वेळ मिळत नाही. अनेकदा रस्त्यावरच गाडीवर डब्बा ठेवून, जिथे जागा मिळेल तिथेच जेवावे लागते. अनेकदा अशी वेळही येते की त्यांना ऑर्डर मिळत नाही. रस्त्याच्या कडेलाच दुचाकी पार्क करू ऑर्डरची वाट पाहावी लागते. सध्या अशाच एक डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये उबेर ईट्सचा डिलिव्हरी बॉय दिसत आहे. हा डिलिव्हरी बॉय भर उन्हात रस्त्याच्याकडेला एका झाडाच्या सावलीत दुचाकी पार्क केली आहे. दुचाकीवर हा डिलिव्हरी बॉय ऑर्डरची वाट पाहत झोपला आहे.

हेही वाचा – चालत्या स्कुटीवर तरुणींचा अश्लील डान्स! व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी, पोलिसांनी अशी घडवली अद्दल की….

व्हिडीओ इंस्टाग्रामवर fish.on.dish नावाच्या अकांऊटवर पोस्ट केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की,”कडक उन्हात रस्त्यावर कुठेही ऑर्डरची वाट पाहणे सोपे नसणार” तसेच व्हिडीओ स्क्रिनवर दिसणाऱ्या कॅप्शमध्ये लिहेल आहे की, ना ऑफिसचा एसी जॉब, ना वर्क फ्रॉम होम, ऑर्डरची वाट पाहत थकल्यावर मिळेल तिथे विसावा घेणाऱ्या माणसाशी जेव्हा ही भेट होईल तेव्हा माणसासारखे वागूया” व्हिडीओला “माणसाने माणसासम वागण” या प्रार्थना संगीत ऐकू येत आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी भावूक झाले आहेत. अनेकांनी व्हिडीओवर कमेंट केली आहे.

हेही वाचा – चालत्या स्कुटीवर उभे राहून तरुणाला रंग लावत होती तरुणी! अचानक ब्रेक दाबला अन्…. व्हिडीओमध्ये बघा पुढे काय घडले

एकाने लिहिले, “भावा अशी शांत झोप अब्जाधिशांच्या नशिबीसुद्ध नाही” दुसऱ्याने लिहिले की, “थकलेल्या जीवाला सावलीचा विसावा.” तिसरा म्हणाला, कष्टाची झोप आहे, काही काही लोकांनी लाखो रुपये असूनही झोप येत नाही. इमानदारीची झोप वेगळीच असते” चौथा म्हणाला,”भाऊ कमी समजू नको,भारी झोप लागते बाईकवर” पाचवा म्हणाला, “खूप सोसावे लागते यार मुलांना पण हार मानायची नाही म्हणजे नाही कधीतरी असा क्षण येईलच जिथून आपल्या आयुष्याला कलाटणी मिळे”