दिल्ली मेट्रोनंतर आता होळीशी संबंधित आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये स्कूटरवर बसलेल्या दोन मुली अश्लील डान्स करताना दिसत आहेत. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये हेल्मेट न घालता स्कूटरवर बसलेले तीन जण होळी खेळताना दिसत आहेत. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. लोकांनी स्कूटर चालवणाऱ्या तिघांवर कारवाई करण्याची मागणी सुरू केली. मात्र, सोशल मीडियावर लोकांच्या तक्रारीनंतर यूपी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील नोएडा येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण.

व्हिडिओमध्ये तीन जण हेल्मेटशिवाय स्कूटरवरून जाताना दिसत आहेत. मुलगा स्कूटर चालवत असताना मागच्या सीटवर दोन मुली बसल्या आहेत. ज्यातील एक तरुणी उलटी बसली आहे म्हणजे मागच्या दिशेला तोंड करून बसली आहे. दुसरी मुलगी सरळ बसली आहे. समोरासमोर बसलेल्या दोन मुली अश्लील कृत्य करताना दिसत आहेत. पार्श्वभूमीत अंग लगा ले हे गाणे वाजत आहे. व्हिडीओ पाहून असा अंदाज लावला जाऊ शकतो की, मागून येणाऱ्या कोणीतरी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला असावा, जो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स विविध कमेंट करत पोलिसांकडून कारवाईची मागणी करत होते.

हेही वाचा – आयुष्यात फक्त असं प्रेम मिळाले पाहिजे! आजोबांना घास भरवणाऱ्या आजींचा व्हिडीओ बघाच

एक्सवर व्हायरल झालेला हा १ मिनिटाचा व्हिडिओ आतापर्यंत ४० हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे की, ‘हेल्मेटशिवाय ड्रायव्हिंग, ट्रिपलिंग आणि स्टंट केले जात आहेत. या लोकांवर कारवाई करावी ही विनंती. दरम्यान पोलिसांनी सोशल साइट एक्सवर सांगितले की, ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल स्कूटी मालकाला ३३ हजार रुपयांचे दंड आकारण्यात आला आहे. होळीपूर्वीच नोएडा पोलिसांनी सणांदरम्यान वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा सल्लाही जारी केला होता. असे असतानाही लोक विचित्र गोष्टी करताना दिसले, त्यांना वाहतूक पोलिसांनी धडा शिकवला. पोलिसांच्या कारवाईचे नेटकऱ्यांनी कौतूक केले आहे. एकाने लिहिले की, महोदय ३३००० त्यांच्यासाठी काही नाही.

हेही वाचा – “रंग लागला तुझा…”, होळीला गौतमीने दिले चाहत्यांना सरप्राइज! पांढरी साडी अन् गालावर लावला लाल रंग, मोहक अदा पाहून…

एका व्हिडीओमधून ते इतके तर कमावत असेल. शिक्षा अशी द्या की ती शिक्षा वाटली पाहिजे. या कारवाईने काही फरक पडणार नाही. काहीतरी कठोर कारवाई करा.” दुसऱ्याने लिहिले,”अत्यंत सुंदर काम केले. पोलिस प्रशासनाला विनंती आहे की त्यांच्या घरातल्या वडीलधाऱ्यांना कॉलेज प्रशासन (जर विद्यार्थी असतील तर) आणि योग्य मार्गदर्शन दिला जावे. “