uaआयुष्यात प्रत्येक व्यक्ती प्रेमाच्या शोधात असतो. अनेकदा लोक प्रेमाच्या भ्रामक कल्पनांमध्ये आपण प्रेम शोधत असतात पण खरं प्रेम आपल्या जवळचं असते फक्त हे ओळखण्याचा आणि अनुभवण्याचा दृष्टीकोन आपल्याकडे नसतो. प्रत्येकाला असा जोडीदार हवा असतो जो कोणत्याही परिस्थितीमध्ये आपली साथ देईल. मग आयुष्यातील संकटे असो की म्हातारपण…..कायम एकमेकांबरोबर राहावे. फार कमी लोकांना असा जोडीदार लाभतो. सोशल मीडियावर अशाच एका आजी-आजोंबाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा- “अंग लगा दे रे, मोहे रंग…”, मेट्रोमध्ये तरुणींच्या अश्लील डान्समुळे ओशाळले प्रवासी! Viral Video पाहून संतापले नेटकरी

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये एक आजी आजोबा जेवताना दिसत आहे. आजोबांची तब्येत ठीक दिसत नाही. आजी आजोंबाची प्रेमाने काळजी घेत आहे. विशेष म्हणजे आजी आपल्या हाताने आजोबांना घास भरवत आहे. आजी आजोबांचा हा व्हिडीओ खरं प्रेम म्हणजे काय याची प्रचिती देते आहे. लोकांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. म्हातारे होईपर्यंत एकमेकांसह राहणे, म्हातारपणी एकमेकांची काळजी घेणे हेच तर खरं प्रेम असतं. आजी आजोंबाचे हे प्रेम पाहून नेटकरी भावूक झाले आहे.

होळीच्या दिवशी गौतमीने दिले चाहत्यांना सरप्राइज! पांढरी साडी नेसून केला डान्स, तिच्या अदा पाहून…

अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट केले आहे. अनेक लोक आपल्या जोडीदाराला टॅग करून एक दिवस आपणही असा दिवस जगू या असे आश्वासन देत आहे. तर काही लोक आजी आजोबांच्या प्रेमाचे कौतूक करत आहे. एकाने कमेंट करताना लिहिले की,”प्रेमाला खरचं एक्सापयरी डेट नसते” दुसऱ्याने लिहिले, “याला म्हणतात खरं प्रेम, या जोडप्यावर देवाची कृपा होवो.” तिसऱ्याने लिहिले, “फक्त आयुष्यभर तुझी साथ हवी आहे.” चौथ्याने लिहिले, “मन जिंकले यार” पाचव्याने लिहले, आयुष्यात आणखी काय पाहिजे,”फक्त असा जोडीदार पाहिजे की आयुष्य सुखी होईल.” सहाव्याने लिहिले की,असे “खरे प्रेम फक्त भारतातच पाहायला मिळू शकते” आणखी एकाने लिहिले की, आयुष्या खूप काही शिकवते.