Viral Video: सोशल मीडियामुळे कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून, त्यातील अनेक मजेशीर किस्से, व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. हे व्हिडीओ पाहून युजर्सचेदेखील भरपूर मनोरंजन होते. या व्हिडीओंमध्ये कधी वधू सुंदर डान्स करताना दिसते. तर कधी वर हटके एन्ट्रीमध्ये येताना दिसतो. आतादेखील लग्नातील असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. पण, यावेळी यात वधू-वर नसून एक वेगळीच व्यक्ती आहे; जिच्याकडे पाहून सर्व जण पोट धरून हसताना दिसत आहेत.

लग्नमंडप म्हटला की, तिथे वर व वधू अशा दोन्ही पक्षांकडील वऱ्हाडी मंडळी, वर-वधू, त्यांचे मित्र-मैत्रिणी असे अनेक लोक उपस्थित असतात. यावेळी लग्नात वधू-वराची एन्ट्री, डान्स यांकडे नेहमीच सर्वांचे लक्ष असतं. हल्ली लग्नात वधू-वराचं प्री-वेडिंग शूटदेखील दाखवलं जातं. पण, तुम्ही कधी लग्नात धूर फवारणी करणारा कोणी आल्याचं पाहिलंय का? नसेलच पाहिलं; पण समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तो लग्नमंडपात आल्याचं दिसत आहे; ज्याला पाहून तुम्हाला हसू येईल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नमंडपात एक जण अचानक येतो आणि तिथे धूर फवारणी करतो. संपूर्ण मंडपात धूर पसरल्याचं पाहून आलेल्या व्यक्ती दुसरीकडे पळतात. यावेळी तिथे काही लोक येतात आणि त्याला धूर मारु नको असं सांगतात, पण तरीही तो थांबत नाही. त्यावेळी एक जण त्याच्या हाताला धरून त्याला तिथून बाहेर काढतो. हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत असून, या व्हिडीओवर “मित्र म्हणालेला, माझ्या लग्नात जाळ अन् धूर करा”, असं लिहिलं आहे.

हेही वाचा: Zomato कडून मोठी चूक; शाकाहारी गर्भवती महिलेला पाठवली नॉनव्हेज थाळी; Photo शेअर करीत पती म्हणाला, “माझ्या पत्नीला त्रास…”

पाहा व्हिडीओ:

या व्हायरल व्हिडीओला आतापर्यंत जवळपास पाच लाखांहून अधिक व्ह्युज आणि १२ हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर नेटकरी अनेक भन्नाट कमेंट्स करताना दिसत आहे. एकानं लिहिलंय, “मच्छर कमी केले भावानं म्हणून माफ केलं मी.” दुसऱ्यानं लिहिलंय, “खरंच यानं जाळ अन् धूर केला लग्नात.” तिसऱ्यानं लिहिलंय, “भावानं जास्तच मनावर घेतलंय वाटतं.” आणखी एकानं लिहिलंय, “हे लग्न याला आवडलं नाही वाटतं.” या व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @marathi_memes_and_trolls या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.