क्रीडा व्यवस्थापन क्षेत्राशी संबंधित विविध अभ्यासक्रमांचा सविस्तर परिचय तसेच क्रीडा विषयक पदव्युत्तर अभ्यासक्रमांची तसेच अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमांची ओळख..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट या संस्थेने क्रीडा व्यवस्थापनास उपयुक्त ठरतील, असे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रीडा व्यवस्थापन शिक्षण आणि भारतीय क्रीडा उद्योग यांच्याशी सुसंगत अशा विविध विषयांचा अभ्यास केला जातो. या अभ्यासक्रमांचा प्रारंभ ऑगस्टमध्ये होतो. प्रथम येणाऱ्यास प्रथम संधी या तत्त्वावर प्रवेश दिले जातात.

हे अभ्यासक्रम मुंबईच्या जयिहद कॉलेज कॅम्पसमध्ये शिकवले जातात.

संस्थेचे अभ्यासक्रम :

  • पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट : अभ्यासक्रमाचा कालावधी- एक वर्ष. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. हा अभ्यासक्रम केल्यावर ऑस्ट्रेलियातील ग्रिफिथ युनिव्हर्सिटीच्या मास्टर्स कोर्स इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो.
  • बॅचलर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट: कालावधी- ३ वष्रे. अर्हता- कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण. या अभ्यासक्रमामध्ये खेळाडू व्यवस्थापन, क्रीडा क्षेत्राशी संबंधित जनसंपर्क, क्रीडा क्षेत्राशी संबंधित कायदे, क्रीडा क्षेत्राला आवश्यक असलेला वित्तपुरवठा व व्यवसाय संधी, समकालीन व्यूहात्मक क्रीडा व्यवस्थापन, क्रीडा समाजशास्त्र, क्रीडा संस्था आणि या संस्थेतील सुविधा व्यवस्थापन, क्रीडा सोहळे सादरीकरण, प्रायोजकत्व आणि विपणन व्यूहनीती, क्रीडा व्यवसाय संशोधन, क्रीडा पत्रकारिता आणि माध्यम, संघ व्यवस्थापन, क्रीडा क्षेत्रातील नीतिमूल्ये आदी विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
  • एमबीए इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट : कालावधी- दोन वर्षे. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. या अभ्यासक्रमात क्रीडा विपणन, क्रीडा वित्त आणि व्यवसाय, क्रीडाविषयक कायदे आणि अधिनियम, क्रीडा व्यवस्थापन धोरण, क्रीडा समाजशास्त्र, क्रीडा सुविधा व्यवस्थापन, क्रीडा सोहळा सादरीकरण आणि प्रायोजकत्व, उपयोजित क्रीडा विपणन संशोधन या मुख्य विषयांचा समावेश आहे.

पुढील विषयांमधून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचा व गती असलेला विषय निवडता येतो- क्रीडा औषधे, प्रगत क्रीडा विपणन, क्रीडा पत्रकारिता, क्रीडा उद्योजकता, आंतरराष्ट्रीय क्रीडा व्यवस्थापन, तळागाळातील क्रीडा विकास, मनुष्यबळ आणि स्वयंसेवक व्यवस्थापन, संघ व्यवस्थापन यांचा समावेश आहे.

संपर्क- इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट, जयिहद कॉलेज, ए रोड, चर्चगेट, मुंबई- ४०००२०.

संकेतस्थळ- www.iismworld.com

ईमेल- info@iismworld.com

स्पोर्ट्स फिजिओथेरेपी :

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्पोर्ट्स फिजिओथेरेपी (पी.जी.डी.एस.पी.) हा अभ्यासक्रम अलगप्पा विद्यापीठात उपलब्ध आहे. शारीरिक शिक्षण (बॅचलर ऑफ फिजिकल ट्रेिनग) किंवा फिजिकल एज्युकेशनमधील पदव्युत्तर पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम करता येतो किंवा वैद्यकीय विषयातील कोणत्याही शाखेतील पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांला अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो.

संपर्क : रजिस्ट्रार अलागप्पा युनिव्हर्सिटी कारायकुडी- ६३०००३. मेल- registraralagappauniv@gmail.com

संकेतस्थळ- www.alagappauniversity.ac.in

क्रीडा पत्रकारिता

ज्या युवक-युवतींना खेळ व पत्रकारिता या दोन्ही विषयांत आवड आहे, त्यांच्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्पोर्ट्स जर्नालिझम हा अभ्यासक्रम उत्तम करिअर घडविण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. हा अभ्यासक्रम कोणत्याही शाखेतील पदवीधराला करता येतो. केंद्र सरकारच्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिकल एज्युकेशन या संस्थेने हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्ष. पत्ता- रजिस्ट्रार, लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिकल एज्युकेशन, शक्ती नगर, रेसकोर्स रोड,

ग्वाल्हेर- ४७४००२. संकेतस्थळ- lnipe.nic.in

ई-मेल- registrar@lnipe.gov.in

क्रीडा मानसशास्त्र : अ‍ॅमिटी स्कूल ऑफ फिजिकल एज्युकेशन अ‍ॅण्ड स्पोर्ट्स सायन्स- या संस्थेने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्पोर्ट्स सायकॉलॉजी हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कालावधी- एक वर्ष. पत्ता- डायरेक्टर, अ‍ॅमिटी स्कूल ऑफ फिजिकल एज्युकेशन अ‍ॅण्ड स्पोर्ट्स सायन्स, अ‍ॅमिटी कॅम्पस, सेक्टर- १२५, नॉयडा, उत्तर प्रदेश- २०१३१३. संकेतस्थळ- www.amity.edu ईमेल- admissions@amity.edu

क्रीडा क्षेत्राशी संबंधित अल्प मुदतीचे अभ्यासक्रम

कोणत्याही क्षेत्रातील यशासाठी कौशल्य प्राप्त करण्याची गरज असते. कौशल्य विकासातून रोजगाराच्या आणि स्वंयरोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकतात. क्रीडा क्षेत्रातही कौशल्यावर आधारित विविध प्रशिक्षण घेतल्यास उत्तम करिअर करता येणे शक्य बनते. ही बाब लक्षात घेऊन नेताजी सुभाष राष्ट्रीय प्रशिक्षण संस्थेने क्रीडा क्षेत्राशी संबंधित विविध अल्प मुदतीचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत.

हे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत  : स्पोर्ट्स मसाज. (दोन आठवडे), फिजिकल कंडिशिनग (४ आठवडे), स्पोर्ट्स न्युट्रिशन अ‍ॅण्ड डायटेटिक्स (पाच आठवडे), जिम मॅनेजमेंट (पाच दिवस), पर्सनल फिटनेस ट्रेिनग (३ आठवडे), लाइफ गार्ड इन पूल स्वििमग (चार आठवडे), सायकॉलॉजी ऑफ स्पोर्ट्स (दोन आठवडे), बायोमेकॅनिक्स ऑफ हय़ुमन परफॉर्मन्स (तीन आठवडे), सायकॉलॉजी ऑफ स्पोर्ट्स परफॉर्मन्स (तीन आठवडे), प्रोजेक्ट्स/इव्हेंट मॅनेजमेंट (तीन आठवडे),  स्पोर्ट्स कम्युनिकेशन (तीन आठवडे), टॅलेंट आयडेंटिफिकेशन इन स्पोर्ट्स (दोन आठवडे), प्रीव्हेन्शन अ‍ॅण्ड मॅनेजमेंट ऑफ इंज्युरीज (दोन आठवडे), रिहॅबिलिटेशन अ‍ॅण्ड रिकव्हरी (दोन आठवडे),  लाइफ गार्ड्स (चार आठवडे), सोशिऑलॉजी ऑफ स्पोर्ट्स (चार आठवडे), स्पोर्ट्स लॉ (तीन आठवडे), ट्रेिनग मेथड्स (दोन आठवडे), स्पोर्ट्स अँथ्रोपॉमेट्री (दोन आठवडे), रिसर्च मेथडॉलॉजी इन स्पोर्ट्स (दोन आठवडे), मेझरमेंट अ‍ॅण्ड इव्हॅल्युएशन इन स्पोर्ट्स (दोन आठवडे).

हे प्रशिक्षण संस्थेच्या पतियाळा, कोलकाता आणि बेंगळुरू कॅम्पसमध्ये घेता येते. हे प्रशिक्षण शारीरिक शिक्षण अध्यापक, क्रीडा प्रशिक्षक, क्रीडा वैज्ञानिक, खेळाडूंचे साहाय्यक यांच्यासाठी उपयुक्त ठरतात.

संपर्क- स्पोर्ट्स अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया, नेताजी सुभाष नॅशनल  इन्स्टिटय़ूट ऑफ स्पोर्ट्स, ओल्ड मोती बाग, पतियाळा- १४७००१. संकेतस्थळ- nsnis.org ई-मेल- mail@nsnis.org

शिष्यवृत्ती

पाँडेचरी विद्यापीठामध्ये विविध पीएच.डी. अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळालेले उमेदवार विद्यापीठ अनुदान आयोगाच्या फेलोशिप योजनेसाठी पात्र ठरतात. या अंतर्गत दरमहा ८ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. इंटिग्रेटेड पीएच.डी. अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या उमेदवारांना पहिली चार सत्रे दरमहा ४ हजार रुपये आणि त्यानंतर उर्वरित कालावधीसाठी दरमहा ८ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. एम.एस्सी. इन मरिन बॉयलॉजी आणि एम.एस्सी इन डिझास्टर मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा शिष्यवृत्ती दिली जाते. संपर्क संकेतस्थळ- www.pondiuni.edu.in

 

 

 

 

 

मराठीतील सर्व way to success बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sports management courses
Show comments