वसई: सोमवारी संध्याकाळी धुळवड साजरी करून झाल्यानंतर वसईच्या कळंब समुद्र किनारी अंघोळ करण्यासाठी गेलेल्या २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. साई किरण चेनुरी असे या मृत तरुणाचे नाव आहे.

हेही वाचा – महायुतीत नाशिकच्या जागेचा तिढा अधिकच किचकट

हेही वाचा – रायगडात महायुतीतील वाद चव्हाट्यावर, शिंदे गटाच्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

वसई विरार शहरात सोमवारी धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. काही नागरिकांनी वसई विरारमधील समुद्र किनाऱ्यावरसुद्धा धुळवडीनिमित्ताने गर्दी केली होती. वसई पूर्वेच्या गोखीवरे परिसरात राहणारा साई किरण हासुद्धा कळंब समुद्र किनारी गेला होता. धुळवड साजरी करून झाल्यानंतर तो समुद्रात अंघोळ करण्यासाठी उतरला याच दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने तो समुद्रात बुडाला होता. त्याचा शोध जीवरक्षक व पोलिसांकडून सुरू होता. रात्री उशिरापर्यंत त्याचा मृतदेह सापडला नव्हता. मंगळवारी हा मृतदेह वसई भुईगाव येथील समुद्र किनारी आढळून आला. या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांनी दिली.