पोर्टफोलिओसाठी शेअर्स निवडताना तो शेअर किती कालावधीसाठी ठेवायचा आहे, त्यातील गुंतवणुकीतून किती परतावा मिळण्याची शक्यता आहे, त्याची द्रवणीयता आणि अर्थात स्टॉप लॉस कितीला करायचा वगरे गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. तुमच्या पोर्टफोलिओमधील प्रत्येक शेअर फायदा देईल असा नसतो किंबहुना तुमच्या पोर्टफोलिओमधील केवळ दोनतीन शेअर्समधील गुंतवणूक तुमचा संपूर्ण पोर्टफोलिओ फायद्यात आणू शकतात. म्हणूनच काही पटींनी फायदा देणारे ग्रोथ शेअर्स शोधणे आवश्यक ठरते. असे मल्टीबॅगर्स (बहुप्रसवा) शक्यतो स्मॉल किंवा मिड कॅप शेअर्समधून मिळण्याची शक्यता जास्त..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुमारे ३० वर्षांपूर्वी स्थापन झालेली पुण्यातील प्राज इंडस्ट्रीज आज भारतातील एक यशस्वी बायोफ्युएल कंपनी मानली जाते. प्राजचा व्यवसाय मुख्यत्वे बायो प्रॉडक्ट्स, पाण्यावरील प्रक्रिया, इथेनॉल आणि ब्रुअरी प्लांट्स इ.मध्ये विभागला आहे. कंपनीची चार उत्पादन केंद्रे असून त्यातील दोन गुजरातमधील कांडला येथे तर दोन महाराष्ट्रात पुणे आणि वाडा येथे आहेत. जगभरात आपली सेवा पुरवणाऱ्या प्राजची डिसेंबर २०१६ साठी संपलेल्या तिमाहीची कामगिरी अपेक्षेप्रमाणेच उत्तम आहे. कंपनीने उलाढालीत २१% वाढ नोंदवून तो २१४.६ कोटींवर तर नक्त नफ्यातही ११०.१% वाढ होऊन तो १६.६ कोटींवर गेला आहे. कंपनीच्या एकूण उलाढालीपकी ६७% उत्पन्न देशांतर्गत सेवांपासून असून सुमारे ३३% उत्पन्न निर्यातीतून होते.

आजच्या घडीला सुमारे १,११५ कोटींच्या ऑर्डर्स हातात असलेल्या प्राजवर कुठलेही कर्ज नाही. दक्षिण अमेरिका, युरोप, आफ्रिका तसेच दक्षिण पूर्व आशियामध्ये गेली अनेक वष्रे कार्यरत असलेली ही कंपनी लवकरच आता शेतीच्या टाकाऊ मालापासून इथेनॉलचे उत्पादन करणार आहे. हा प्रयत्न यशस्वी झाला तर ती एक क्रांतीच मानावी लागेल.

सूचना: लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) लेखात सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

stocksandwealth@gmail.com

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Portfolio for shares
Show comments