18th May Panchang & Rashi Bhavishya: १८ मे २०२४ ला वैशाख शुक्ल पक्षातील उदया तिथीनुसार दशमी तिथी आहे. शनिवारच्या दिवशी सकाळी ११ वाजून २४ मिनिटांपर्यंत दशमी तिथी असणार आहे व त्यानंतर एकादशी तिथीचा प्रारंभ होणार आहे. १८ मेला सकाळी १० वाजून २५ मिनिटांपर्यंत हर्षण योग असणार आहे व त्यानंतर वज्र योग सुरु होईल. शनिवारी रात्री १२ वाजून २४ मिनिटांपर्यंत उत्तरा फाल्गुनी नक्षत्र जागृत असणार आहे. या दिवशी ग्रहमानानुसार कोणत्या राशींना लाभाचे संकेत आहेत तर कुणाला जपून राहावे लागणार आहे हे पाहूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१८ मे पंचांग व राशी भविष्य

मेष:-तुमचा आवेग योग्य ठिकाणीच दाखवा. काही ठिकाणी नरमाईचे धोरण ठेवणे योग्य ठरेल. मैत्रीतील कटुता टाळण्याचा प्रयत्न करावा. अनोळखी लोकांवर चटकन विश्वास ठेवू नका. कौटुंबिक कामे आनंदाने कराल.

वृषभ:-घरगुती कामे वाढतील. स्थावरचे प्रश्न मार्गी लावावे लागतील. खळाळता उत्साह मावळू देऊ नका. अती कामामुळे थकवा जाणवेल. कामानिमित्त जवळचा प्रवास करावा लागेल.

मिथुन:-वैचारिक गोंधळ टाळण्याचा प्रयत्न करावा. मनात अनेक शंका उत्पन्न होऊ शकतात. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. कौटुंबिक जिव्हाळा वाढीस लागेल. बोलतांना विचारपूर्वक बोलावे.

कर्क:-स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. प्रकृतीची वेळीच काळजी घ्यावी. बाहेरील अन्नपदार्थ खाऊ नयेत. अनावश्यक गोष्टींवर खर्च केला जाईल. मनातील अपेक्षांना मूर्त स्वरूप द्याल.

सिंह:-नवीन लोकांशी मैत्री वाढेल. तरुण वर्गाच्या जास्त संपर्कात याल. आधुनिक विचारांची देवाणघेवाण होईल. मानसिक चांचल्य जाणवेल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका.

कन्या:-पोटाची काहीशी तक्रार राहील. आहाराची योग्य ती पथ्ये पाळावी लागतील. नियोजनबद्ध कामे सुरळीत पार पडतील. प्रवास सावधानतेने करावा. मन लावून काम करणे गरजेचे राहील.

तूळ:-जोडीदाराची मते जाणून घ्या. वडिलोपार्जित कामे लाभदायक ठरतील. बाहेर गावी जाण्याचे बेत आखाल. कायद्याच्या चौकटीत राहून कामे करावीत. मनातील क्षुल्लक गैरसमज दूर करावेत.

वृश्चिक:-जोडीदाराची प्राप्ती वाढेल. स्थावरची कामे अचानक सामोरी येऊ शकतात. पूर्व नियोजित कामात यश येईल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. नको तिथे आपले मत मांडू नका.

धनू:-तुमच्या कर्तृत्वात वाढ होईल. कोणतेही काम करतांना सर्व खात्री करून घ्यावी. खेळाडूंनी अधिक कसरत करावी. महत्वाकांक्षेच्या जोरावर धाडस करतांना सावधानता बाळगा. अचानक धनलाभ संभवतो.

मकर:-मुलांकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कोणत्याही प्रलोभनाला भुलून जाऊ नका. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अनावश्यक खर्च केला जाईल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल.

कुंभ:-घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. प्रवासात सामानाची काळजी घ्यावी. फसवणुकीपासून सावध राहावे. कसलीही घाई त्रासदायक ठरू शकते. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात.

हे ही वाचा<< शनी महाराज ‘या’ दिवशी घर सोडणार; २०२७ पर्यंत गुरुकडे राहून ‘या’ ३ राशींना देणार अपार संपत्ती; यश पायाशी घालेल लोटांगण

मीन:-वादाचे प्रसंग टाळलेलेच बरे. कलात्मक दृष्टीकोन ठेवून वागाल. गप्पा मारण्याची हौस पूर्ण कराल. इतरांचा तुमच्या विषयी गैरसमज होऊ शकतो. व्यावसायिक लाभावर लक्ष केंद्रित करा.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 18 may panchang saturday shani will be more powerful falgun nakshtra 12 rashi horoscope kundali todays marathi astrology money and power svs