Shukra Rashi Parivartan 2024: ज्योतिष शास्त्रानुसार, कुंडलीत उपस्थित असलेले सर्व ग्रह वेळोवेळी आपली राशी बदलत राहतात. शुक्र ग्रह प्रेम, सौंदर्य, धनाचा कारक आहे. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र शुभ स्थितीत असतो. त्यांना आयुष्यात चांगला प्रभाव दिसून येते. संपत्तीचा कारक असलेले शुक्रदेव मार्चमध्ये शनिदेवाच्या कुंभ राशीत राशी परिवर्तन करणार आहेत. शुक्र ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे काही राशींसाठी अच्छे दिन सुरु होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या राशीच्या लोकांना शुक्राच्या या स्थितीचा लाभ मिळू शकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘या’ राशींसाठी अच्छे दिन?

वृषभ राशी

शुक्र हा वृषभ राशीचा स्वामी मानला जातो. अशा परिस्थितीत वृषभ राशीच्या लोकांसाठी चांगला काळ सुरू होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात, ज्यामुळे प्रचंड पैसा मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होऊ शकते. या काळात खूप चांगल्या बातम्या ऐकायला मिळू शकतात. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ते पूर्ण होऊ शकते. वैवाहिक जीवनात मधुरता राहण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा : १ फेब्रुवारीपासून ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरु? बुधलक्ष्मीच्या कृपेने होऊ शकतात कोट्यवधींचे मालक )

तूळ राशी

शुक्र तूळ राशीचा देखील स्वामी आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना शुक्रदेवाच्या राशी परिवर्तनाचा मोठा फायदा होऊ शकतो. नोकरी-व्यवसायातील लोकांना पदोन्नती मिळण्याची आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना या काळात वाहन सुख मिळू शकते. यासोबतच उत्पन्नाचे स्रोतही वाढू शकतात. तुमची अडकलेली कामं या काळात पूर्ण होऊ शकतात. तुम्ही अविवाहित असाल तर लग्न जुळण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात खूप प्रगती होण्याची शक्यता आहे.

कुंभ राशी

शुक्रदेव कुंभ राशीतच गोचर करत असल्याने या लोकांना फायदेच फायदे मिळू शकतात. जर तुम्ही व्यापारी वर्गातील असाल तर तुम्हाला मोठा पैसा मिळू शकतो. बिझनेसमध्ये एखादी मोठी डील फायनल करून फायदा होऊ शकतो. बेरोजगारांना नोकरीच्या संधी मिळू शकतात. कौटुंबिक सहकार्य मिळेल आणि धनलाभ होण्याची चिन्हे आहेत. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. कामात चांगली प्रगती होऊ शकते. पैसा, मान सन्मान मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. वैवाहिक आयुष्यात सुख समाधान लाभण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shukra planet transit in kumbh positive impact on these zodiac signs bank balance to raise money pdb
First published on: 25-01-2024 at 11:58 IST