मे महिन्यात टाटा मोटर्स आपल्या कारच्या विविध श्रेणींवर मोठा डिस्काऊंट देत आहे. टाटाने निवडक मॉडेल्सवर ६०,००० रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी ग्राहकांना दिली आहे. या डिस्काऊंटमध्ये कॅश बेनेफिट्स, एक्स्चेंज बोनस आणि ऑटोमेकरच्या विविध ऑफरमधून कॉर्पोरेट फायदे मिळणार आहेत. येथे उपलब्ध आकर्षक ऑफर्सची माहिती दिली आहे.

टाटा टियागो (Tata Tiago)

तुम्ही जर लोकप्रिय टाटा टियागो खरेदी करण्याचा विचार करत असलेले ग्राहक असाल तर तुम्हाला पेट्रोल XT(O), XT आणि XZ ट्रिम्सवर ६०,००० रुपयांपर्यंतचे फायदे मिळू शकतात. या प्रकारांमध्ये ४५,००० रुपयांचे कॅश बेनेफिट्स, १०,००० रुपयांचा एक्स्चेंज बोनस आणि ५,००० रुपयांचे कॉर्पोरेट फायदे आहेत. टियागोच्या पेट्रोल कारसाठी ३५,००० रुपयांचे कॅश डिस्काऊंट मिळतील, तर Tiago CNG कारसाठी २५,००० रुपयांचे कॅश डिस्काऊंट मिळू शकते. एक्स्चेंज बोनस आणि कॉर्पोरेट फायदे सर्व प्रकारच्या कारसाठी एकसमान राहतील.

टाटा अल्ट्रोझ प्रीमियम(Tata Altroz premium)

Tata Altroz प्रीमियम हॅचला डिझेल आणि पेट्रोल MT दोन्ही प्रकारामध्ये ५०,००० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. यामध्ये ३५,००० रुपयांची रोख सूट, १०,००० रुपयांचा एक्स्चेंज बोनस आणि ५,००० रुपयांचे कॉर्पोरेट फायदे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, Altroz CNG प्रकारच्या कारवर ३५,००० रुपयांपर्यंतचे फायदे; २०,००० रुपयांच्या कॅश डिस्काऊंटसह एक्स्चेंज बोनस आणि कॉर्पोरेट फायदे मिळतात.

हेही वाचा – पुण्यात दोघांना चिरडणाऱ्या आलिशान पोर्शे कारचे फीचर्स माहितीये? किंमत पाहून व्हाल थक्क

टाटा टिगोर (Tata Tigor)

टाटा टिगोरच्या त्याच्या सेडान XZ+ आणि XM कारवर खरेदीदारांना रु. ५५,००० चा लाभ घेऊ शकतात. या मॉडेल्सवर ४०,००० रुपयांची रोख सूट; १०,००० रुपयांचा एक्स्चेंज बोनस आणि ५,००० रुपयांचे कॉर्पोरेट फायदे आहेत. इतर टिगोर पेट्रोल प्रकारांना ३०,००० रुपयांची रोख सवलत मिळते, तर टिगोर सीएनजी व्हेरियंटवर १०,००० रुपयांच्या एक्सचेंज बोनससह ३०,००० रुपयांची कॅश डिस्टाउंट दिला जातो.

टाटा नेक्सॉन (Tata Nexon)

Tata Nexon SUVच्या डिझेल कारवर एकूण २०,००० रुपयांच्या डिस्काऊंटचा आनंद घेऊ शकतात, ज्यामध्ये१५,००० रुपयांची कॅश डिस्काउंट आणि ५,००० रुपयांचे कॉर्पोरेट फायदे आहेत. दरम्यान, Nexon पेट्रोल प्रकारात रु. १०,००० च्या कॅश डिस्काउंटसह रु. ५,००० चा कॉर्पोरेट लाभ आहे. मॉडेलवर कोणताही एक्स्चेंज बोनस नाही..

हेही वाचा – बाकी कंपन्या फक्त पाहतच राहिल्या; महिंद्राच्या ‘या’ नव्या स्वस्त SUV कारला १ तासात ५० हजार मिळाल्या बुकींग, किंमत फक्त…

याशिवाय, पंच SUV, सध्या भारतातील सर्वाधिक विकली जाणारी SUV, ३००० रुपयांच्या कॉर्पोरेट डिस्काउंटशिवाय कोणताही बोनस मिळत नाही. दुसरीकडे, काही डीलरशिप Harrier आणि Safari SUV वर ५०,००० रुपयांच्या एक्सचेंज बोनससह ७५,००० रुपयांपर्यंत मोठ्या प्रमाणात कॅश डिस्काऊंट देत आहेत. पण ग्राहकांनी हे लक्षात घ्यावे की, या सवलती मॉडेल, ट्रिम, रंग इत्यादीच्या उपलब्धतेवर अवलंबून आहेत आणि अचूक तपशीलांसाठी जवळच्या डीलरशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला जातो.