How to Stop Bike: आपल्या देशात बहुतेक लोकांकडे वैयक्तिक वाहन म्हणून दुचाकी आहेत. दुचाकी वाहने वापरणे ही सर्वांची दैनंदिन गरज बनली आहे. त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात दुचाकी वापरण्याला पसंती देत असतात. अनेकांना बाईक चालवण्याची प्रचंड आवड असते. मात्र, अनेक दुचाकीस्वारांना बाईक चालवण्याची योग्य पद्धत कोणती आहे, हे माहिती नसल्यामुळे त्यांच्याकडून बाईक चालवताना चूक होते, व त्यामुळे अपघातही होऊ शकतात. अनेकांना बाईकच्या ब्रेकिंगबद्दल फारशी चांगली माहिती नसेल. बाईक थांबवण्यासाठी आधी क्लच की ब्रेक दाबावे, क्लच दाबावे की नाही, किंवा क्लच कधी दाबायचा हे अनेकांना माहीत नसेल. चला तर मग आज आपण बाईक थांबवण्यासाठी आधी क्लच दाबावे की ब्रेक? जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाईक थांबवण्यासाठी आधी क्लच दाबावे की ब्रेक?

बाईक थांबवताना आधी काय दाबावे हे परिस्थितीवर अवलंबून असते. म्हणजेच तुम्ही ब्रेक कुठे लावता, ब्रेक का लावता, ब्रेक लावताना बाईकचा वेग किती आहे आणि बाईक कोणत्या गिअरमध्ये आहे. हे तुम्हाला समजून घेणे फार महत्त्वाचे आहे.

(हे ही वाचा : कार खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! टाटाच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या ‘या’ २ इलेक्ट्रिक गाड्या झाल्यात स्वस्त)

  • बाईकच्या समोर कोणी आले आणि अचानक ब्रेक लावण्याची गरज भासली तर अशा परिस्थितीत क्लच आणि ब्रेक दोन्ही एकाच वेळी दाबणे योग्य आहे. क्लच आणि ब्रेक सहसा आपत्कालीन परिस्थितीत एकत्र वापरले जातात, कारण बाईकच्या यांत्रिक भागांना इजा न करता ब्रेक लावण्याचा हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. मात्र, अचानक ब्रेक लावताना अत्यंत काळजी घेतली पाहिजे.
  • जर तुम्ही रस्त्यावर वेगाने बाईक चालवत असाल आणि तुम्हाला फक्त वेग कमी करायचा असेल तर तुम्ही क्लच न वापरता थेट ब्रेक दाबून बाईकचा वेग कमी करू शकता. मग तुम्हाला बाईक थांबवावी लागेल किंवा बाईकचा वेग सध्याच्या गीअरच्या सर्वात खालच्या पातळीवर पोहोचला आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला क्लच दाबून खालच्या गिअरवर जावे लागेल. असे न केल्यास दुचाकी बंद पडेल.
  • जर तुम्ही बाईक सामान्य वेगाने चालवत असाल आणि तुम्हाला बाईकचा वेग आणखी कमी करायचा असेल तर फक्त ब्रेक दाबल्यानेही वेग कमी होईल. त्यासाठी क्लच वापरण्याची गरज नाही. ब्रेकचा वापर फक्त बाईकचा वेग कमी करण्यासाठी किंवा वाटेत किरकोळ अडथळे टाळण्यासाठी केला जाऊ शकतो.
  • जर तुम्ही कमी वेगाने प्रवास करत असाल आणि तुम्हाला ब्रेक लावण्याची गरज असेल, तर प्रथम क्लच दाबा आणि नंतर ब्रेक दाबा. कारण आधी ब्रेक दाबल्यास बाईक बंद पडू शकते. असं पहिल्या किंवा दुसऱ्या गिअरमध्ये प्रवास करताना करता येतं आणि जास्त वेगात आधी ब्रेक लावावेत कारण आधी क्लच आणि नंतर ब्रेक दाबल्यास दुचाकी स्लिप होण्याचा धोका असतो.
मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Braking tips to stop the bike should the clutch or brake be pressed first pdb
First published on: 17-02-2024 at 15:47 IST