नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील देशातील आघाडीच्या कंपन्यांच्या मनुष्यबळात मार्चअखेर सरलेल्या आर्थिक वर्षात घट नोंदविण्यात आली आहे. यात टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रो या प्रमुख कंपन्यांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विप्रो कंपनीच्या मनुष्यबळात मागील दशकभरात तिसऱ्यांदा वार्षिक घट नोंदविण्यात आली आहे. कंपनीचे मनुष्यबळ आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या सुरुवातीला २ लाख ५८ हजार ५७० होते. आर्थिक वर्षाच्या अखेरीस ते २ लाख ३४ हजार ५४ वर घसरले. वर्षभरात कंपनीच्या मनुष्यबळात एकूण २४ हजार ५१६ म्हणजेच ९.५ टक्के घट झाली. सलग सहाव्यात तिमाहीत विप्रोच्या मनुष्यबळात घट झाली आहे.

हेही वाचा >>> Gold-Silver Price on 19 April 2024: सोन्याच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्याचं बजेट बिघडवलं, जाणून घ्या १० ग्रॅमचा दर

टीसीएसचे मनुष्यबळ गेल्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला ६ लाख १४ हजार ७९५ होते. आर्थिक वर्ष संपले त्या वेळी हे मनुष्यबळ ६ लाख १ हजार ५४६ वर आले आहे. मनुष्यबळात एकूण १३ हजार २४९ म्हणजेच २.१ टक्के घट नोंदविण्यात आली. टीसीएसच्या मनुष्यबळात १९ वर्षांमध्ये पहिल्यांदाच घट झाली आहे.

इन्फोसिसचे मनुष्यबळ गेल्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला ३ लाख ४३ हजार २३४ होते. आर्थिक वर्षाच्या अखेरीस ते ३ लाख १७ हजार २४० वर आले. वर्षभरात कंपनीच्या मनुष्यबळात एकूण २५ हजार ९९४ म्हणजेच ७.५ टक्के घट नोंदविण्यात आली आहे. कंपनीच्या मनुष्यबळात दोन दशकांत प्रथमच घट झाली आहे.

मनुष्यबळातील घट २०२३-२४

कंपनी – एकूण घट – टक्क्यांमध्ये

विप्रो – २४ हजार ५१६ – ९.५

इन्फोसिस – २५ हजार ९९४ – ७.५

टीसीएस – १३ हजार २४९ – २.१

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Layoffs in 2024 leading it companies cutting jobs in year 2024 print eco news zws