पुणे : देशातील गृहनिर्माण क्षेत्रात तेजीचे वारे दिसून येत आहे. यंदा पहिल्या तिमाहीत देशातील सात महानगरांत १ लाख ३० हजारांहून अधिक घरांची विक्री झाली. गेल्या वर्षातील पहिल्या तिमाहीच्या तुलनेत घरांच्या विक्रीत १४ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, देशातील घरांच्या बाजारपेठेत मुंबई आणि पुण्याचा एकत्रित हिस्सा आता ५१ टक्क्यांवर पोहोचला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> ‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  

देशातील सात महानगरांतील गृहनिर्माण क्षेत्राचा अहवाल अनारॉक ग्रुपने जाहीर केला आहे. हा अहवाल जानेवारी ते मार्च या तिमाहीचा आहे. या अहवालानुसार, यंदा पहिल्या तिमाहीत १ लाख ३० हजार १७० घरांची विक्री झाली. गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत १ लाख १३ हजार ७७५ घरांची विक्री झाली होती. त्या तुलनेत घरांच्या विक्रीत यंदा १४ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. देशातील एकूण घरांच्या विक्रीत मुंबई आणि पुण्याचा वाटा निम्म्याहून अधिक म्हणजेच ५१ टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत घरांच्या विक्रीत मुंबईत २४ टक्के आणि पुण्यात १५ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.

हेही वाचा >>> Gold-Silver Price on 27 March 2024: सोन्याच्या किमतीमध्ये वाढ सुरुच, तर चांदीची चकाकी उतरली, पाहा आजचे दर

देशातील सात महानगरांत पहिल्यात तिमाहीत १ लाख १० हजार ८६५ नवीन घरांचा पुरवठा झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात किरकोळ १ टक्का वाढ झाली आहे. मुंबई आणि हैदराबादमध्ये नवीन घरांचा सर्वाधिक पुरवठा झाला. एकूण नवीन घरांच्या पुरवठ्यात मुंबई आणि हैदराबादचा एकत्रित वाटा ५१ टक्के आहे. नवीन घरांच्या पुरवठ्यात हैदराबादमध्ये ५७ टक्के वाढ नोंदविण्यात आली असून, मुंबईत ९ टक्क्यांची घट झाली आहे, असे अहवालाने नमूद केले आहे.

भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वांत वेगाने वाढ साधत आहे, बरोबरच सध्या महागाईही नियंत्रणात आहे. त्यामुळे ग्राहक घर खरेदीबाबत सकारात्मक असल्याचे चित्र आहे. याचबरोबर नवीन घरांचा पुरवठाही वाढत आहे.
– अनुज पुरी, अध्यक्ष, अनारॉक ग्रुप

देशातील घरांची विक्री

शहर – जाने ते मार्च २०२४ –   जाने ते मार्च २०२३
मुंबई – ४२,९२०   –       ३४,६९०
पुणे –   २२,९९०  –         १९,९२०
हैदराबाद – १९,६६० –    १४,२८०
बंगळुरू – १७,७९० –        १५,६६०
दिल्ली – १५,६५० –        १७,१६०
कोलकता – ५,६५० –        ६,१८५
चेन्नई – ५,५१० –            ५,८८०

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai pune share 51 percent of total sales in housing market print eco news zws