नवी दिल्ली : नव्या युगाची रोकडरहित देयक व्यवहारांचा आधुनिक पर्याय असलेल्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात यूपीआयसारखी प्रणाली विकसित करण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) बँक ऑफ नामिबियासोबत करार केला आहे. त्या देशात अशी प्रणाली विकसित करण्यासाठी एनपीसीआयच्या परदेशातील कंपनीला काम सोपवण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> निर्मिती क्षेत्राचा वेग मंदावला; एप्रिलमध्ये पीएमआय निर्देशांक घसरून ५८.८ गुणांकावर

भारताच्या यूपीआय तंत्रज्ञानाचा आणि अनुभवांचा फायदा नामिबियाला त्याच्या आर्थिक परिसंस्थेचे आधुनिकीकरण करण्यासाठी करून देण्याचा हा प्रयत्न आहे. यामध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय देयक तंत्र-जाळ्यासह सुलभ, परवडणारी प्रणाली सुरू करणे समाविष्ट आहे. एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेडने बँक ऑफ नामिबियासोबत हा करार केला आहे. या धोरणात्मक भागीदारीचे उद्दिष्ट आफ्रिकी राष्ट्रांमध्ये डिजिटल वित्तीय सेवा वाढवणे आणि रिअल-टाइम पर्सन-टू-पर्सन (पीटूपी) आणि व्यापारी देयक व्यवहार (पीटूएम) वाढविणे हे आहे. नामिबियामध्ये त्यांच्या नागरिकांच्या डिजिटल कल्याणासाठी समान व्यासपीठ तयार करणे शक्य होणार आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Npci bank of namibia sign an agreement to develop upi like system print eco news zws
Show comments