पीटीआय, नवी दिल्ली
आघाडीची पतमानांकन संस्था ‘इक्रा’ची उपकंपनी प्रगती डेव्हलपमेंट कन्सल्टिंग सर्व्हिसेस लिमिटेडला (पीडीसीएसएल) कंपन्यांना पर्यावरण, सामाजिक बांधिलकी आणि सु-प्रशासन अर्थात ‘ईएसजी’ केंद्रीत मानांकन बहाल करण्यास भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने सोमवारी परवानगी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यामुळे आता ईएसजी मानांकन बहाल करणाऱ्या मोजक्या भारतीय कंपन्यांमध्ये इक्रा समूहाचा समावेश झाला आहे. याबाबत इक्राने स्पष्ट केले की, इक्राच्या मालकीच्या पीडीसीएसएल कंपनीच्या नोंदणीला सेबीने मंजुरी दिली आहे. ही कंपनी सेबी पतमानांकन संस्था नियमावलीच्या अंतर्गत वर्ग-१ ईएसजी मानांकन प्रदाता म्हणून काम करेल.

हेही वाचा >>>‘मलेशिअन डेव्हलपमेंट बरहाद’ : घोटाळ्यांचा बाप! (भाग १)

पीडीसीएसएलने यासाठी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सेबीकडे अर्ज केला होता. सेबीने पतमानांकन संस्थांच्या नियमावलीत गेल्या वर्षी दुरूस्ती केली होती. त्यामुळे पतमानांकन संस्था नोंदणीसाठी सेबीकडे थेट अर्ज करू शकतात. गेल्याच आठवड्यात सेबीने ‘क्रिसिल ईएसजी रेटिंग्ज अँड ॲनालिटिक्स’ या संस्थेला वर्ग -१ ईएसजी मानांकन प्रदाता म्हणून परवानगी दिली आहे.

ईएसजी काय आहे?

ईएसजी म्हणजे कंपन्यांकडून जपली जाणारी पर्यावरणविषयक संवेदनशीलता, सामाजिक भान आणि उत्तम प्रशासनाच्या तत्त्वांना दिला जाणारा प्राधान्यक्रमाचा निकष आहे. या जबाबदारीच्या निकषावर आणि मानकांवर कंपन्या कसे गुण मिळवतात त्यानुसार त्यांची संभाव्य गुंतवणुकीसाठी निवडीचा नवप्रघात जागतिक स्तरावर लोकप्रिय असून, तो भारतातही आता रूजू पाहत आहे.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sebi approval of icra subsidiary for esg rating print eco amy