Money Mantra नुकतेच म्हणजे १ एप्रिल २०२४ पासून सुरू झालेल्या आर्थिक वर्षात आयआरडीने विमा पॉलिसीबाबत ग्राहक हिताचा बदल केला आहे, तो आज आपण समजून घेऊ. १ एप्रिल २०२४ पासून देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या इन्शुरन्स पॉलिसीज आता डिजिटल स्वरुपात (शेअर्स प्रमाणे डीमॅटपद्धतीने ) देणे बंधनकारक असणार आहे. आयआरडीएची ही सूचना लाईफ इन्शुरन्स व जनरल इन्शुरन्स पॉलिसीजसाठी लागू असणार आहेत. अशा डिजिटल पॉलिसीज कार्वी, कॅम्स, एनडीएमएल, सेन्ट्रल इन्शुरन्स रिपॉझिटरी या चार रिपॉझीटरीज मार्फत दिल्या जातील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

थोडक्यात, नव्याने मिळणारी कोणतीही इन्शुरन्स पॉलिसी आता डिजिटल स्वरुपात चारपैकी एका रिपॉझटरीच्या ई-इन्शुरन्स अकाऊंटमध्ये दिल्या जातील. त्यासाठी नवीन पॉलिसी घेताना चार पैकी कोणत्या इन्शुरन्स रिपॉझिटरीकडे आपल्याला आपले ई- इन्शुरन्स अकाऊंट हवे आहे ते कळवावे लागते, त्यानुसार सबंधित इन्शुरन्स कंपनी आपले ई-इन्शुरन्स अकाऊंट उघडते. आपले ई- इन्शुरन्स अकाऊंट असेल तर तसे नवीन पॉलिसी घेताना सबंधित इन्शुरन्स कंपनीस कळवावे लागते म्हणजे नव्याने देण्यात येणारी इन्शुरन्स पॉलिसी आपण दिलेल्या ई- इन्शुरन्स अकाऊंट मध्ये डिजिटल (इलेक्ट्रॉनिक) स्वरुपात दिली जाते.

हेही वाचा…बाजार रंग : पोर्टफोलिओचा डाव मांडताना….

स्वतः उघडू शकता ई – इन्शुरन्स अकाऊंट

ई – इन्शुरन्स अकाऊंट आपण स्वत:ही उघडू शकता (आपल्याला हव्या असलेल्या वरील चार पैकी कोणत्याही एका इन्शुरन्स रिपॉझिटरीवर)त्यासाठी सबंधित रिपॉझिटरीच्या वेबसाईटवर हा फोरम उपलब्ध असतो व त्या सोबतच केवायसी पूर्ततेसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांचा तपशीलही दिलेला असतो. हे खाते ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने उघडता येते. मात्र एका व्यक्तीस एकच ई- इन्शुरन्स अकाऊंट उघडता येते, तसेच हे खाते एकाच नावाने उघडता येते, संयुक्त नावाने हे खाते उघडता येत नाही. खाते उघडण्यासाठी काहीही खर्च येत नाही.

आपल्या सध्या असलेल्या सर्व इन्शुरन्स पॉलिसीज (उदा: एकाहून अधिक आयुर्विमा पॉलिसीज, आपल्या वाहन विमा तसेच आरोग्य विमा पॉलिसीज) आपण या ई- इन्शुरन्स अकाऊंटमध्ये डिजिटली रुपांतरीत (कन्व्हर्ट ) करू शकतो तसा पर्याय सबंधित रिपॉझिटरीच्या वेबसाईटवर उपलब्ध असतो.

हेही वाचा…मार्ग सुबत्तेचा : मल्टिअ‍ॅसेट पोर्टफोलिओ – काय, का आणि कसा?

ई- इन्शुरन्स अकाऊंटचे खालील महत्वाचे फायदे आहेत-

-आपल्या सर्व इन्शुरन्स पॉलिसीज एकाच खात्यात डिजिटल स्वरुपात असल्याने हरवणे / फाटणे/ खराब होणे ही शक्यता राहत नाही.
-आपल्या सर्व पॉलिसीजची माहिती एकाच ठिकाणी सहजगत्या उपलब्ध असते.
-नॉमिनी/ पत्ता / फोन- मोबाइल नंबरमधील बदल एकाच ठिकाणी म्हणजे ई- इन्शुरन्स अकाऊंट मध्ये केला जातो सर्व पॉलिसीजमध्ये तो एकाचवेळी आपोआप होत असतो.
-प्रत्येक नवीन पॉलिसीसाठी नव्याने केवायसी पूर्तता करावी लागत नाही.
-खाते उघडण्यासाठी काहीही खर्च येत नाही.

तरीही सर्व पॉलिसीधारकांनी हे फायदे लक्षात घेऊन नवीन ई- इन्शुरन्स अकाऊंट शक्य तितक्या लवकर उघडून आपल्या सर्व पॉलिसीज सुरक्षित कराव्यात व त्यानुसार मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घ्यावा.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money mantra what is digital insurance policy and its procedure to register mmdc psg
Show comments