इंडियन कोस्ट गार्ड ( ICG) (संरक्षण मंत्रालय)मध्ये नाविक (जनरल ड्युटी) पदांची कोस्ट गार्ड एन्रोल्ड् पर्सोनेल टेस्ट (CGEPT) मार्फत – ०२/२०२४ बॅचसाठी पुरुष उमेदवारांना प्रवेश. पदनिहाय रिक्त पदांची संख्या –

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

(१) नाविक (जनरल ड्युटी) – २६० (रिजन/ झोननिहाय रिक्त पदे – नॉर्थ – ७९, वेस्ट – ६६, नॉर्थ-ईस्ट – ६८, ईस्ट – ३३, नॉर्थ-वेस्ट – १२, अंदमान-निकोबार – ३). वेस्ट झोनमध्ये महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक, दादरा नगर हवेली, दमण-दीव, लक्षद्विप, केरळ इ. चा समावेश होतो. नॉर्थ-वेस्ट झोनमध्ये गुजरात राज्याचा समावेश होतो.

पात्रता – १२ वी (फिजिक्स आणि मॅथ्स विषयांसह) उत्तीर्ण.

शारीरिक मापदंड – उंची – १५७ सें.मी., छाती – किमान ५ सें.मी. फुगविता येणे आवश्यक. वजन – उंची आणि वय यांच्या प्रमाणात – १० टक्के

वयोमर्यादा – १८ ते २२ वर्षे. (उमेदवाराचा जन्म दि. १ सप्टेंबर २००२ ते ३१ ऑगस्ट २००६ दरम्यानचा असावा.) (अजा/अज – २७ वर्षेपर्यंत, इमाव – २५ वर्षेपर्यंत)

हेही वाचा >>> UPSC ची तयारी : निबंधाची तयारी भाग-२

वेतन – पे-लेव्हल – ३, मूळ वेतन रु. २१,७००/- इतर भत्ते. अंदाजे वेतन दरमहा रु. ४०,०००/-.

उमेदवारांना रु. ७५ लाखाचे विमा संरक्षण दिले जाईल. उमेदवारांस आणि त्यांच्या कुटुंबासाठी सरकारी निवास उपलब्ध असेल/ निवास नको असल्यास HRA दिला जाईल. उमेदवारांना रेशन आणि कपडे पुरविले जातील. स्वतसाठी आणि अवलंबून असलेल्यांसाठी मेडिकल सेवा दिली जाईल. निवृत्तीनंतर ECHS मेडिकल सेवा उपलब्ध असेल. Canteen Facility ( CSD) आणि इतर लोन फॅसिलिटी दिली जाईल.

नाविक gd पदावरील कामाचे स्वरूप https://joinindiancoastguard.cdac.in/cgept/joinnavikgd.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

निवड पद्धती – उमेदवारांना स्टेज-१ ते स्टेज-४ पूर्ण कराव्या लागतील.

स्टेज-१ – लेखी परीक्षा – कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन. ( i) मूळ कागदपत्र पडताळणी – (१) ओरिजिनल आयडेंटीटी प्रूफ, ऑनलाइन अर्जासोबत अपलोड केलेले (आधारकार्ड/ पॅनकार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट), (२) ई-अॅडमिट कार्डची रंगीत कॉपी, (३) ऑनलाइन अर्ज करताना अपलोड केलेल्या पासपोर्ट आकाराच्या रंगीत फोटोग्राफसारखे २ फोटोग्राफ्स, (४) अजा/अजसाठी जातीचा दाखल्याच्या स्वयंसाक्षांकीत २ प्रती, मूळ ट्रेन/बस तिकीट, NEFT पेमेंटसाठी रद्द केलेला चेक आणि ट्रव्हलिंग अलाऊन्स (TA) क्लेम करण्यासाठी वेबसाईटवरून डाऊनलोड केलेला travel form.

( ii) बायोमेट्रिक रेकॉर्डिंग

( iii) पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना वस्तुनिष्ठ बहुपर्यायी लेखी परीक्षा द्यावी लागेल.

( a) सेक्शन-१ – (एकूण ६० प्रश्न, ६० गुण, वेळ ४५ मिनिटे). (ज्यात गणित (२० गुण), विज्ञान (१० गुण), इंग्रजी (१५ गुण) जनरल नॉलेज (५ गुण) आणि रिझनिंग (१० गुण) या विषयांवर आधारित प्रश्न असतील.) (१० वी स्तरावरील प्रश्न)

( b) सेक्शन-२ (ज्यात १२ वी स्तरावरील गणित आणि फिजिक्स विषयावर प्रत्येकी २५ प्रश्न.) (एकूण ५० प्रश्न, ५० गुण, वेळ ३० मिनिटे).

सेक्शन-१ मध्ये पात्रतेसाठी अजा/ अजच्या उमेदवारांना २७ गुण आवश्यक. इतर उमेदवारांना ३० गुण; सेक्शन-२ मध्ये पात्रतेसाठी अजा/अजच्या उमेदवारांना १७ गुण आवश्यक, इतरांना २० गुण.

हेही वाचा >>> नववी ते १२ वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांची ओपन बुक परीक्षा होणार?CBSE यंदा नोव्हेंबरमध्ये करणार प्रयोग, काय बदलणार?

चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा केले जाणार नाहीत. (स्टेज-१ लेखी परीक्षा एप्रिल २०२४ मध्यास/शेवटास होईल.)

स्टेज-२ – ( i) असेसमेंट/ अॅडाप्टिबिलिटी टेस्ट – बायोमेट्रिक तपासणी झालेले उमेदवारांना OMR बेस्ड लेखी परीक्षा द्यावी लागेल. या टेस्टचा निकाल परीक्षा घेतल्यानंतर १ तासाच्या आत जाहीर केला जाईल. ( ii) चाचणी मे २०२४ च्या मध्यास/ शेवटास घेतली जाईल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणारे उमेदवार शारीरिक क्षमता चाचणीस (PFT) सामोरे जातील. (जी एक-दोन दिवसांची असेल.) PFT मध्ये १.६ कि.मी. ७ मिनिटांत धावणे, २० स्क्वॅटअप्स (उठक बैठक), १० पुशअप्स यांचा समावेश असेल. स्टेज-२ साठीचे ई-अॅडमिट कार्ड उमेदवारांनी ICG च्या वेबसाईटवर (दिलेल्या मुदतीत (२७ फेब्रुवारी २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ग्राह्य असलेली)) आवश्यक ती कागदपत्रे अपलोड केल्यानंतरच जनरेट करता येतील. ( iii) कागदपत्र पडताळणी, ( iv) इनिशियल मेडिकल एक्झामिनेशनमधून पात्र ठरलेल्या उमेदवारांची स्टेज-१ मधील गुणवत्तेनुसार ऑल इंडिया मेरिट लिस्ट बनविली जाईल.

स्टेज-३ साठीचे अॅडमिट कार्ड ऑक्टोबर २०२४ च्या सुरूवातीस/मध्यास उपलब्ध होतील. स्टेज-१ व स्टेज-२ मधून पात्र ठरलेल्या उमेदवारांचा ज्यांचा ऑल इंडिया मेरिट लिस्टमध्ये समावेश असेल, त्यांना स्टेज-३ साठी E- admit Card ICG जारी करेल. इंडियन कोस्ट गार्डच्या ( www. joinindiancoastguard. gov. in/ cgept/) या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल. (i) कागदपत्र पडताळणी, (ii) फायनल मेडिकल INS Chilka येथे, (iii) मूळ कागदपत्रे, पोलीस व्हेरिफिकेशन व इतर फॉर्म्स दाखल करणे.

स्टेज-४ – जे उमेदवार स्टेज-३ मधील कागदपत्र पडताळणी पूर्ण करतील त्यांची फायनल मेरिट लिस्टप्रमाणे ट्रेनिंगसाठी पाठविले जाईल.

उमेदवारांनी अर्जासोबत पुढील मूळ कागदपत्रे (jpeg/ jpg format मध्ये) स्कॅन करून अपलोड करणे अनिवार्य आहे.

(१) पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटोग्राफ (१४ डिसेंबर, २०२३ नंतर चष्मा न घालता काढलेला) (फोटो काढताना उमेदवारांनी कॅपिटल लेटरमध्ये आपले नाव आणि फोटो काढल्याचा दिनांक पांढऱ्या खडूने पाटीवर लिहून पाटी छातीजवळ पकडलेली असावी.) (२) उमेदवाराची स्कॅण्ड् सिग्नेचर. (३) स्कॅण्ड् डाव्या हाताच्या अंगठ्याची प्रतिमा. (४) १० वीचे गुणपत्रक किंवा जन्मतारखेचा दाखला. (इंग्रजी किंवा हिंदी भाषेतील). (५) डोमिसाईल सर्टिफिकेट (ज्या रिजनच्या पदांसाठी अर्ज केला आहे ते तपासण्यासाठी). (६) फोटो आयडेंटिटी प्रूफकरिता – आधारकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड इ.

स्टेज-२ साठी शॉर्टलिस्ट झाल्यास काही कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील. (१) कॅटेगरी सर्टिफिकेट (अजा/ अज/ इमाव/ ईडब्ल्यूएस) (२) १० वीचे गुणपत्रक, (३) १० वीचे प्रमाणपत्र, (४) १२ वीचे गुणपत्रक, (५) १२ वीचे प्रमाणपत्र.

स्टेज-१ व स्टेज-२ साठी परीक्षा केंद्र – उमेदवारांनी आपल्या राहत्या घरापासून ३० कि.मी. अंतराच्या आतील असलेल्या परीक्षा केंद्राला प्रथम पसंती देणे आवश्यक आहे. जर राहत्या घरापासून ३० कि.मी. अंतराच्या आत परीक्षा केंद्र नसल्यास सर्वात जवळच्या परीक्षा केंद्रास प्रथम पसंती द्यावी. एकूण ५ केंद्रांना पसंती देणे आवश्यक.

अर्जाचे शुल्क – रु. ३००/- (फक्त ऑनलाइन मोडने). (अजा/अजसाठी फी माफ आहे.)

ट्रेनिंग – सप्टेंबर, २०२४ च्या सुरुवातीस/मध्यास INS, चिल्का येथे ट्रेनिंग सुरू होईल. त्यानंतर दिलेल्या ट्रेडमधील प्रोफेशनल ट्रेनिंग दिले जाईल.

अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना https://joinindiancoastguard.cdac.in/cgept/selectionInformation/guidelines/fillingonline application वर उपलब्ध आहेत.

शंकासमाधानासाठी फोन नं. ०२०-२५५०३१०८/ २५५०३१०९ किंवा ई-मेल icgcell@cdac. in वर संपर्क साधावा.

स्टेज-१ साठी परीक्षा केंद्राचे (शहराचे) नाव परीक्षेपूर्वी १० दिवस अगोदर उमेदवारांना Candidate Login वर उपलब्ध करून दिले जाईल. अॅडमिट कार्ड परीक्षेच्या पूर्वी २-३ दिवस अगोदर X Candidates login वर आणि ई-मेल द्वारे उपलब्ध करून दिले जाईल.

इमाव उमेदवारांनी OBC (NCL) सर्टिफिकेट https://joinindiancoastguard.cdac.in/cgept/ या संकेतस्थळावर दिलेल्या नमुन्यातीलच असावे.ऑनलाइन अर्ज https://joinindiancoastguard.cdac.in/cgept/ या संकेतस्थळावर दि. २७ फेब्रुवारी २०२४ (१७.३० वाजे) पर्यंत भरावयाचे आहेत.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coast guard recruitment indian coast guard recruitment 2024 zws