● १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण अविवाहीत पुरुषांना इंजिनीअर होऊन पर्मनंट कमिशन मिळविण्यासाठी इंडियन आर्मीमध्ये जानेवारी, २०२५ पासून सुरू होणाऱ्या ‘१० + २ Technical Entry Scheme ( TES) – ५२’ कोर्ससाठी JEE ( Mains) २०२४ च्या स्कोअरवर आधारित प्रवेश. प्रवेश क्षमता – ९०. पात्रता – १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स विषयांत (पीसीएम) किमान सरासरी ६० टक्के गुण आवश्यक आणि खएए ( Mains) २०२४ परीक्षेस बसलेले असावेत. अर्जामध्ये उमेदवारांनी १२ वीला त्यांनी मिळविलेले PCM विषयातील गुणांची दोन डेसिमल पॉईंटपर्यंतची टक्केवारी दाखविणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – १६ १/२ ते १९ १/२ वर्षे. उमेदवाराचा जन्म २ जुलै २००५ ते १ जुलै २००८ दरम्यानचा असावा. १० वी प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली जन्मतारीख ग्राह्य धरली जाईल.

उंची – किमान १५७ सें.मी. (२.५ सें.मी. पर्यंत उंचीमध्ये सूट दिली जाईल. यासाठी मेडिकल बोर्डाचा दाखला सादर करावा लागेल. ज्यात ‘उमेदवाराचे ट्रेनिंग पूर्ण होईपर्यंत उंची वाढू शकते.’ असे सर्टिफाय केलेले असेल.) वजन – उंची आणि वय यांच्या प्रमाणात. छाती – ८१८६ सें.मी.

निवड पद्धती – JEE ( Mains) मधील गुणवत्तेनुसार शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांना प्रयागराज (यूपी), भोपाळ (एम.पी), बंगलोर (कर्नाटक), जालंदर (पंजाब) यापैकी एका सिलेक्शन सेंटरचे आणि एसएसबी इंटरह्यूसाठीच्या तारखा यांचे वाटप केले जाईल. ऑगस्ट/ सप्टेंबर, २०२४ मध्ये एसएसबी इंटरह्यू दोन फेजेसमध्ये घेतला जाईल. (कालावधी ५ दिवस) फेज-१ मधून अनुत्तीर्ण उमेदवारांना परत पाठविले जाईल. एसएसबी इंटरह्यूमधील कामगिरीवर आधारित गुणवत्ता यादी बनविली जाईल. अंतिम निवड वैद्याकीय तपासणी नंतर केली जाते. ज्या उमेदवारांना ररइ साठी निवडले आहे, त्यांनी संबंधित कॅडेट्स ट्रेनिंग विंग्सच्या ३ नावांना पसंतीक्रम द्यावा लागेल. ( CTW, CME, पुणे; CTW, MCTE, Mhow आणि CTW- MCEME, सिकंदराबाद)

खालील CTWs मध्ये पुढील स्ट्रीममधील इंजिनीअरिंग ट्रेनिंग दिले जाते.

(१) CTW, CME, पुणे ( Corps of Engineering) – सिव्हील अँड मेकॅनिकल इंजिनीअरिंग

(२) CTW, MCTE Mhow ( Corps of Signals) – आय्टी अँड टेलीकॉम इंजिनीअरिंग

(३) CTW, MCEME, सिकंदराबाद ( Corps of Electronics & Mechanical Engineers) – इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनीअरिंग

ट्रेनिंग – एकूण ४ वर्षं कालावधीसाठी ट्रेनिंग दिले जाईल. फेज-१ – (ए) इंटिग्रेटेड बेसिक मिलिटरी ट्रेनिंग आणि इंजिनिअरिंग ट्रेनिंग – कालावधी ३ वर्षं (सीएमई, पुणे किंवा एमसीटीई, महू किंवा एमसीईएमई, सिकंदराबाद येथे), फेज-२ – (बी) १ वर्ष कालावधीचे इंटिग्रेटेड बेसिक मिलिटरी ट्रेनिंग आणि इंजिनीअरिंग ट्रेनिंग इंडियन मिलिटरी अॅकॅडमी ( INA) डेहराडून येथे. (सी) ४ वर्षांचे ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या उमेदवारांना जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीकडून इंजिनीअरिंगमधील पदवी दिली जाते. ट्रेनिंगची ३ वर्षं पूर्ण झाल्यावर कॅडेट्सना रु. ५६,१००/- दरमहा स्टायपेंड दिले जाईल.

वेतन – ४ वर्षांच्या ट्रेनिंगनंतर कॅडेट्सना लेफ्टनंट पदावर परमनंट कमिशन दिले जाईल. वेतन असेल – मूळ पगार रु. ५६,१००/- मिलिटरी सर्व्हिस पे रु. १५,५००/- अधिक इतर भत्ते. एकूण वेतन अंदाजे रु. १.२० लाख. ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर जेंटलमेन कॅडेट्सना ट्रेनिंगच्या कालावधीसाठीचे रु. ५६,१००/- वरील इतर भत्त्यांची थकबाकी दिली जाईल. युनिफॉर्म अलाऊंस रु. २०,०००/- प्रति वर्ष. ट्रेनिंग दरम्यान पहिल्या ३ वर्षांसाठी रु. १५ लाखांचा विमा संरक्षण व त्यानंतर रु. १ कोटीचे विमा संरक्षण दिले जाईल.

प्रमोशनसाठीचे निकष – लेफ्टनंट पदावरील नेमणूक कमिशन मिळालेल्या दिवसापासून कॅप्टन पदावर प्रमोशन २ वर्षांचे कमिशन पूर्ण झाल्यानंतर, मेजर पदावर प्रमोशन ६ वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर, लेफ्टनंट कर्नल पदावरील प्रमोशन १३ वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर, कर्नल ( TS) रँकवरील प्रमोशन २६ वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर. त्यानंतरची प्रमोशन्स कर्नल, ब्रिगेडियर, मेजर जनरल इत्यादी निवड पद्धतीने दिली जातील.

ऑनलाइन अर्ज www. joinindianarmy. nic. in या संकेतस्थळावर दि. १३ जून २०२४ (१२.०० वाजे) पर्यंत करावेत. ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यावर डायलॉग बॉक्सवर त्याची पोहोच दिसेल. ३० मिनिटांनंतर उमेदवारांनी अर्जाची प्रिंटआऊट (दोन कॉपी) काढावी. त्यातील एक कॉपी उमेदवारांनी एसएसबी इंटरह्यूच्या वेळी आवश्यक कागदपत्रांसह सादर करावी. (१० वीचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रक (इन ओरिजिनल); १२ वीचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रक (इन ओरिजिनल); आयडी प्रूफ इन ओरिजिनल. JEE ( mains) २०२४ च्या निकालाची प्रत आणि त्यांच्या स्वयंसाक्षांकीत २ प्रती आणि पासपोर्ट आकाराचे २० फोटोग्राफ्स जे स्वयंसाक्षांकीत करावेत.)

शंकासमाधानासाठी Rtg वेबसाईट www. joinindianarmy. nic. in वर उमेदवारांना Feedback/ Queries Option वापरता येईल.