सुहास पाटील
मुंबई युनिव्हर्सिटी – डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी (DAE), सेंटर ऑफ एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस (CEBS) (UM- DAE CEBS), मुंबई येथे पुढील विषयांतील स्कूल्समध्ये डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी (Ph.D.) करण्यासाठी प्रवेश.

(१) फिजिकल सायन्सेस : पात्रता – M.Sc. (Physics) (शक्यतो (desirable) न्यूक्लियर फिजिक्स, मॅथेमॅटिकल फिजिक्स, प्लाझ्मा फिजिक्स, कंडेन्स्ड मॅटरफिजिक्स आणि कॉम्प्युटेशनल फिजिक्स विषयांसह).

(२) केमिकल सायन्सेस : पात्रता – M.Sc. (Chemistry) (जनरल, इनऑरगॅनिक केमिस्ट्री, ऑरगॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, बायो-केमिस्ट्री किंवा मटेरियल केमिस्ट्री).

(३) मॅथेमॅटिकल सायन्सेस : पात्रता – मास्टर्स डिग्री इन मॅथेमॅटिक्स (अलजेब्रा, टोपोलॉजी आणि ॲनालिसिसमधील स्ट्राँग बॅकग्राऊंडसह).

(४) बायोलॉजिकल सायन्सेस : पात्रता- M.Sc. (Mathematics) (लाईफ सायन्सेस, मायक्रोबायोलॉजी, बॉटनी, झूऑलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी, बायोकेमिस्ट्री आणि बायोफिजिक्स).

पात्रतेचे निकष : (१) पदव्युत्तर पदवीला किमान ५५ टक्के गुण आवश्यक किंवा पॉईंट स्केलवरील समतूल्य ग्रेड. (अजा/अजसाठी किमान ५० टक्के गुण आवश्यक.)

(२) UGC- CSIR- NET (JRF or LS)/ SLET/ GATE/ NBHM/ JEST/ DBT- BET/ DST- INSPIRE or PET (मुंबई विद्यापीठातील) अर्हता प्राप्त केलेली असावी.

वयोमर्यादा : १ जानेवारी २०२४ रोजी २८ वर्षेपर्यंत. (इमाव – ३१ वर्षे, अजा/अज – ३३ वर्षे)

फेलोशिप : उमेदवारांना सुरुवातीला DAE ची ज्युनियर रिसर्च फेलोशिप दरमहा रु. ३७,०००/- + २७ टक्के एचआरए (रु. ९,९९०/-), एकूण रु. ४६,९९०/- दिली जाईल किंवा त्यांना DBT, DST (INSPIRE), UGC/ CSIR/ NBHM यांची फेलोशिप घेता येईल. दोन वर्षांनंतर फेलोशिपची रक्कम वाढविली जाईल.

UM- DAE CEBS कडून राहण्याची व्यवस्था पुरविली जाणार नाही.

निवड पद्धती : लेखी परीक्षा आणि/ किंवा इंटरव्ह्यू घेऊन उमेदवारांची निवड केली जाईल.

Ph.D. चा कालावधी किमान ३ वर्षांचा असेल. (प्रवेश घेतल्या दिवसापासून ते Ph.D. Thesis सादर करेपर्यंत) जो जास्तीत जास्त ५ वर्षांपर्यंत फेलोशिपसह वाढविला जाऊ शकतो.

Ph.D. कोर्स वर्क यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर उमेदवारांना मुंबई विद्यापीठाकडे Ph.D. साठी रजिस्ट्रेशन करता येईल.

UM- DAE CEBS मध्ये प्रवेश घेतल्यानंतर २ वर्षं १० महिने पूर्ण झाल्यावरच (रजिस्ट्रेशननंतर १० महिने पूर्ण केल्यावर) उमेदवारांना मुंबई विद्यापीठाकडे Synopsis सबमिट करता येईल.

उमेदवारांना Enrolment Fee, Registration Fee, Annual Fee इ. प्रवेश घेतेवेळी रु. १९,७००/- (खुला गट व इमाव उमेदवारांना); रु. ११,७००/- (अजा/अज उमेदवारांना) भरावी लागेल.

Ph.D. प्रोग्रामविषयी विस्तृत माहिती https:// www. cbs. ac. in/ academics/ mannual- forphd- students या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्ज https://www.cbs.ac.in या संकेतस्थळावर दि. ३० एप्रिल २०२४ पर्यंत करावेत.