Premium

तमिळनाडूत ‘मिचौंग’चे १२ बळी; चेन्नईत नौका-ट्रॅक्टरने मदत

पावसाशी संबंधित दुर्घटनांत जखमी झालेल्या अन्य ११ जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

cyclone michaung death toll rises to 12 in rain hit chennai
लष्कराच्या जवानांनी चेन्नईमधील पूरस्थितीत अडकलेल्या रहिवाशांची सुटका केली.

चेन्नई : ‘मिचौंग’ चक्रीवादळ तामिळनाडूच्या उत्तर किनारपट्टीवर मंगळवारी धडकले. चेन्नई आणि लगतच्या जिल्ह्यांना सोमवारपासून मुसळधार पावसाने तडाखा दिल्याने आतापर्यंत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या १२ झाली आहे. पावसाशी संबंधित दुर्घटनांत जखमी झालेल्या अन्य ११ जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगळवारी शहर आणि आसपासच्या भागात जलमय झालेल्या भागांत अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी नौका आणि ट्रॅक्टरचा वापर करण्यात आला.

हेही वाचा >>> एक लाख रुपये जवळ असूनही भिकाऱ्याचा भुकेमुळे मृत्यू, जाणून घ्या कुठे घडली ही घटना?

* संपूर्ण शहरात अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागात मदतकार्य करण्यासाठी जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलाची अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत. मंगळवारी सकाळपासून चेन्नईच्या बहुतांश भागात पावसाचा प्रभाव अत्यल्प राहिला, त्यामुळे अधिकाऱ्यांना बचाव आणि मदत कार्याला गती देण्यासाठी उसंत मिळाली.

* मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की राज्यात मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. चेन्नईसह नऊ वादळ-पूरग्रस्त जिल्ह्यांत एकूण ६१ हजार ६६६ मदत शिबिरे उभारली आहेत. त्यात आतापर्यंत सुमारे ११ लाख अन्नाची पाकिटे आणि एक लाख दूध पिशव्यांचे वाटप करण्यात आले आहे. चेन्नई महापालिकेने इतर जिल्ह्यांतील पाच हजार अतिरिक्त कामगारांना मदतकार्यासाठी बोलावले आहे. हे कामगार ट्रॅक्टर आणि नौकांद्वारे बचाव कार्य करत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cyclone michaung news death toll rises to 12 in rain hit chennai zws

First published on: 06-12-2023 at 02:49 IST
Next Story
विभाजनवादापासून सावध राहा! पंतप्रधानांची विरोधकांवर टीका; ‘इंडिया’ आघाडीची आजची बैठक लांबणीवर