बांगलादेशमध्ये विरोधी पक्षाने भारतावर बहिष्कार घालण्याची मोहीम सुरू आहे. सोशल मीडियावर BoycottIndia ट्रेंड सुरू करण्यात आला असून भारताने बांगलादेशच्या राजकारणावर दबाव आणल्याचा आरोप या मोहिमेद्वारे करण्यात आला आहे. ही मोहिम सुरू झाल्यामुळे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी विरोधकांवर संताप व्यक्त केला आहे. टाईम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी विरोधकांच्या भारत बहिष्कार मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गेल्या आठवड्यात एका भाषणात पंतप्रधान हसीना शेख यांनी बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाला भारतीय वस्तूंवर बहिष्कार घातल्याप्रकरणी सुनावले होते. विरोधक भारतीय मसाल्यांशिवाय खाऊ शकतात का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.

बीएनपीचे नेते भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा सल्ला देत आहेत. माझा प्रश्न आहे की बहिष्कार घालणाऱ्या लोकांच्या पत्नींकडे किती भारतीय साड्या आहेत? ते त्यांच्या बायकांकडून साड्या घेऊन जाळत का नाहीत? असा उद्विग्न सवाल त्यांनी विचारला. शेख हसीना यांच्या नेतृत्त्वाखालील बांगलादेशचे भारताबरोबर चांगले संबंध आहेत. यावर्षी हसीना यांनी पंतप्रधान पदी पाचव्यांदा शपथ घेतली.

बांगलादेशात भारतीय उत्पादनावर बहिष्कार का?

बांगलादेशच्या अंतर्गत राजकारणात भारताच्या कथित हस्तक्षेपाला विरोध करण्यासाठी बीएनपीचा BoycottIndia ट्रेंड सुरू झाला आहे. इंडिया टुडेने केलल्या विश्लेषणानुसार, बीएनपीकडून BoycottIndia मोहिमेला वेग आला आहे. मोहिमेसाठी सुरू करण्यात आलेल्या काही ट्वीटमध्ये युट्यूब व्हिडीओच्या क्लिप शेअर करण्यात आल्या आहेत. यामध्ये भारताने बांगलादेशच्या निवडणुकीत गेल्या १५ वर्षांपासून हस्तक्षेप आणि प्रभाव पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. व्हीडिओमध्ये असंही म्हटलं आहे की भारताने श्रीलंकेला आर्थिक संकटाच्या वेळी कोणतीही मदत केली नव्हती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First burn your wives sarees bangladesh pm sheikh hasina questions oppositions boycott india call sgk