Premium

नवाज मोदींचा नवा आरोप, “गौतम सिंघानियांनी मला उपाशीपोटी तिरुपती मंदिराच्या….”

नवाज मोदी यांची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे त्यामध्ये त्यांनी हा आरोप केला आहे.

What Nawaz Modi Said?
नवाज मोदी यांचा गौतम सिंघानियांवर आणखी एक आरोप (फोटो-X)

रेमंड ग्रुपचे संचालक गौतम सिंघानिया हे त्यांच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहेत. त्यांच्यावर त्यांच्या पत्नीने आता नवा आरोप केला आहे. नवाज मोदी आणि आपण विभक्त होत असल्याची घोषणा गौतम सिंघानिया यांनी X या सोशल मीडिया साईटच्या त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरुन केली होती. त्याच दिवशी नवाज मोदी यांना रेमंड हाऊसच्या दिवाळी पार्टीला येऊ न दिल्याचा आणि त्यांनी दाराबाहेर ठिय्या मांडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. गौतम सिंघानियांनी मला आणि माझ्या मुलींना मारहाण केली असाही आरोप नवाज मोदींनी केला आहे. आता त्यात आणखी एका आरोपाची भर पडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटलं आहे नवाज मोदी यांनी?

नवाज मोदींची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. ज्यामध्ये नवाज मोदींनी म्हटलं आहे की गौतम सिंघानिया यांनी त्यांना उपाशीपोटी तिरुपती मंदिराच्या पायऱ्या चढायला लावल्या. त्यांचं असं म्हणणं आहे गौतम सिंघानियांनी मी लग्नाला होकार दिल्यानंतर मला ते तिरुपतीच्या दर्शनाला घेऊन गेले होते. त्यावेळी मला पाणीही दिलं नाही, अन्न तर सोडाच पण उपाशीपोटी सगळ्या पायऱ्या चढायला लावल्या. एक-दोनदा तर मला चक्कर आली होती. मात्र गौतम सिंघानिया यांना दया आली नाही.

हे पण वाचा- गौतम सिंघानिया-नवाज मोदी वादात विजयपत सिंघानियांची एंट्री, “मला रस्त्यावर आणून त्याला खूप आनंद झाला, कारण..”

मला चक्कर आली तरीही लक्ष दिलं नाही

नवाज मोदी म्हणाल्या, मला गौतम सिंघानियांनी सांगितलं की तुला या पायऱ्या उपाशीपोटी चढून जायचं आहे. मला तेव्हा काहीही कल्पना नव्हती की नेमक्या किती पायऱ्या आहेत. मला चक्कर येता येता राहिली मात्र गौतम सिंघानियांनी माझ्याकडे काहीही लक्ष दिलं नाही. तुला पायऱ्या चढाव्याच लागतील अशी सक्ती ते करत राहिले आणि मला उपाशी पोटी तिरुपतीच्या मंदिरात नेलं असा आरोप आता नवाज मोदींनी केला आहे. गौतम सिंघानिया हे तिरुपती बालाजीचे भक्त आहेत. त्यामुळे त्यांनी असं केल्याचंही नवाज मोदी यांनी या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे. इंडिया टुडेने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

हे पण वाचा- कोण आहेत नवाज मोदी? गौतम सिंघानियांपासून विभक्त झाल्याने आहेत चर्चेत

गौतम सिंघानिया हे त्यांच्या उंची आणि राजेशाही जीवनपद्धतीसाठी ओळखले जातात. त्यांचा आणि नवाज मोदी यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. गौतम सिंघानिया यांच्याकडे नवाज मोदींनी त्यांच्या संपत्तीच्या ७५ टक्के रक्कम मागितली आहे. एका मुलाखतीत नवाज मोदी यांनी हादेखील आरोप केला होता की गौतम सिंघानिया यांनी आपल्याला आणि आपल्या मुलींना मारहाण केली. ९ सप्टेंबरच्या दिवशी पहाटे आम्हाला मारहाण झाली आणि त्यानंतर गौतम सिंघानिया तिथून निघून गेले असं त्या म्हणाल्या होत्या. या सगळ्या आरोपांवर गौतम सिंघानिया यांनी बोलण्यास नकार दिला आहे. माझ्या प्रायव्हसीचा आदर ठेवा, मला घरातल्या गोष्टी चव्हाट्यावर आणायच्या नाहीत असं त्यांनी इंडिया टुडेला सांगितलं होतं. आता नवाज मोदी आणि गौतम सिंघानिया यांच्यातल्या किती आरोपांची मालिका समोर येते आहे ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gautam singhania forced me to climb tirupati temple steps with no water and food said nawaz modi scj

First published on: 28-11-2023 at 08:22 IST
Next Story
विकास दराबाबत ६.४ टक्क्यांचा अंदाज , ‘एस अँड पी’चे ०.४ टक्क्यांच्या अधिक वाढीचे सुधारीत अनुमान