भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केलेले पैसे देशातील गरिबांना परत करण्यासाठी केंद्र सरकारद्वारे पर्याय शोधले जात आहेत, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. तसेच यासंदर्भात कायदेतज्ज्ञांशी चर्चा सुरू असल्याचेही ते म्हणाले. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – नरेंद्र मोदींचा टोला, “बोफोर्सचं पाप धुण्यासाठी राफेलचा मुद्दा काढला गेला, काँग्रेसच्या काही लोकांना मानसिक आजार..”

नेमकं काय म्हणाले नरेंद्र मोदी?

“भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत जप्त करण्यात आलेले पैसे गरीबांना कसे देता येईल, यासंदर्भात मी खूप विचार करतो आहे. मला मनापासून वाटते, की हा पैसा गरीबांना परत मिळावा, कारण हा पैसा भ्रष्टाचाऱ्यांनी गरिबांजवळून लुटला आहे. यासाठी केंद्र सरकार विविध पर्याय शोधत आहे”, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. तसेच “मला यासाठी कायद्यात बदल करावे लागले तर मी ते करेन. याबाबतीत मी कायदेतज्ज्ञांशी चर्चा करतो आहे”, असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना, “भारतीय दंड संहितेच्या जागी आणण्यात आलेल्या न्याय संहितेत यासंदर्भात काही तरतुदी आहेत, असेही त्यांनी सांगितले. तसेच तपास यंत्रणांनी आतापर्यंत १.२५ लाख कोटी रुपये जप्त केले आहेत ”, अशी माहितीही त्यांनी दिली.

हेही वाचा – मुंबई : शिवाजी पार्कवरील महायुतीच्या सभेची जय्यत तयारी, सव्वालाख नागरिकांची उपस्थिती अपेक्षित

पुढे बोलताना त्यांनी मोदी सरकार ईडीचा गैरवापर करत असल्याच्या विरोधकांच्या आरोपाही प्रत्युत्तर दिलं. “ईडी ही तपास संस्था आम्ही निर्माण केलेली नाही. काँग्रेसच्या काळातही ही संस्था अस्थित्वात होती. मात्र, त्यावेळी ती त्यांच्या कार्यक्षमतेनुसार कार्य करू शकत नव्हती. आज ईडी त्यांच्या पूर्ण कार्यक्षमतेने कार्य करत आहे. त्यांना त्यांचं काम करू द्यायला हवं”, असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government planning to return money seized by ed to poor people in india said pm narendra modi spb