गेल्या काही वर्षांत पती-पत्नीमध्ये वाद होऊन हत्येचे प्रकार वाढले. शुल्लक कारणावरून जोडीदाराची हत्या केली जाते. आणि ही हत्या इतकी क्रूर आणि निर्दयी असती की ऐकणाऱ्याच्या भुवया उंचावल्या जातात. आता कर्नाटकातूनही अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

रात्रीचं जेवण दिलं नाही एकाने त्याच्या पत्नीची निर्घूण हत्या केली. या हत्येप्रकरणी कर्नाटकातील शिवारामा याला अटक करण्यात आली आहे. आरोपी पती करवतीवर काम करतो. त्याने पत्नीबरोबर झालेल्या भांडणात तिच्या डोक्यावर वार केला आणि नंतर तिची कातडी सोलून काढली. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

डोकं धडावेगळं केलं, कातडी सोलली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिची त्वचा कापल्याने तिच्या नसा आणि आतड्या दिसत होत्या. तिच्या शरीराशेजारी तिचं कापलेलं डोकं ठेवलं होतं. कुनिगल तालुक्यातील हुलीयुरुदुर्गा शहरात सोमवारी रात्री ही घटना घडली.

हेही वाचा >> Sex Tape Scandal : प्रज्वल रेवण्णा जर्मनीहून रवाना, भारतात आल्यानतंर तपास यंत्रणांना सहकार्य करणार?

आरोपी शिवरामाचे पत्नी पुष्पलथा (३५) हिच्याशी नियमित वाद होत होते. सोमवारी रात्री पुष्पलथाने आपल्या पतीला जेवण न दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. शिवरामाच्या नोकरीवरून त्यांच्यात भांडण झाले. त्यामुळे संतापलेल्या शिवारमाने तिच्यावर चाकूने वार केले. नंतर डोके कापून तिच्या शरीराचे काही भाग विलग केले. मंगळवार पहाटेपर्यंत तो तिच्या शरीराची कातडी काढत होता. दरम्यान, या हत्येविषयी त्यांच्या घरमालकाला कळल्याने त्याने पोलिसांशी संपर्क साधला.

पत्नीची हत्या केली तेव्हा त्यांचा आठ वर्षांचा मुलगा गाठ झोपेत होता. तुमकूरचे पोलिस अधीक्षक अशोक व्यंकट म्हणाले, “घटनास्थळी एका ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला. तिचा नवराही घटनास्थळी होता. चौकशीदरम्यान त्याने हत्येची कबुली दिली.”

“आम्ही आरोपीला ताब्यात घेतले आहे. शिवराम आणि पुष्पा यांचा १० वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला होता. त्यांच्यात किरकोळ भांडण झाले होते. काल त्यांच्यात नोकरीच्या मुद्द्यावरून भांडण झाले होते. त्याने पत्नीची हत्या करून त्याच्या मालकाला कळवले. त्यांनी लगेच आम्हाला कळवले. आम्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला”, असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.