पीटीआय, नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी प्रचार संपल्यानंतर भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) सर्व उमेदवारांना व्यक्तिगत पत्र लिहिले. आपला संदेश प्रत्येक रालोआ उमेदवाराच्या मतदारसंघातील मतदारांपर्यंत पोहोचवावा, अशी अपेक्षा मोदी यांनी त्यात व्यक्त केली आहे.

देशाच्या सद्या:परिस्थितीला उज्ज्वल भविष्याशी जोडण्यासाठी ही लोकसभा निवडणूक एक संधी आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. ‘‘माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण मी लोकांच्या कल्याणासाठी समर्पित केला आहे’’, हा माझा संदेश प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवा, अशी सूचनाही मोदी यांनी पत्रात केली आहे.

मोदी यांनी पाठवलेली दोन पत्रे भाजपच्या सूत्रांनी प्रसारित केली आहेत. त्यापैकी एक पत्र तमिळनाडूचे भाजप प्रदेशाध्यक्ष आणि काईम्बतूरचे उमेदवार के. अण्णामलाई यांना इंग्रजीत, तर दुसरे भाजपचे मुख्य प्रवक्ते आणि उत्तराखंडच्या पौरी गढवाल मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अनिल बलुनी यांना हिंदीत लिहिलेले आहे. या पत्रांद्वारे पंतप्रधानांचा संदेश प्रादेशिक भाषांमध्ये मतदारांपर्यंत पोहोचवण्यावरही भर देण्यात आल्याचे सांगितले. के. अण्णामलाई यांना पाठवलेल्या पत्रात त्यांच्या विजयाबद्दल मोदी यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

हेही वाचा >>>प्रचाराची सांगता; लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा, विदर्भातील पाच मतदारसंघांत उद्या मतदान

‘‘गेल्या दहा वर्षांत समाजातील प्रत्येकाच्या अडचणी दूर करून त्यांचा जीवनस्तर उंचावण्यात आला. तथापि, अद्याप खूप काही करणे बाकी असून प्रत्येकाला चांगल्या जीवनाची हमी देणाऱ्या आपल्या ‘मिशन’साठी ही निवडणूक निर्णायक असेल. गेल्या पाच-सहा दशकांच्या काँग्रेसच्या सत्ताकाळात देशातील सर्व कुटुंबांना, विशेषत: कुटुंबातील ज्येष्ठांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले, ते त्यांना आठवत असेल. म्हणून ही निवडणूक आपल्या वर्तमानाला आणि उज्ज्वल भविष्य काळाशी जोडणारी एक संधी आहे.’’

ही निवडणूक निर्णायक’

‘‘गेल्या दहा वर्षांत नागरिकांचा जीवनस्तर उंचावण्यात आला. तथापि, अद्याप खूप काही करणे बाकी असून प्रत्येकाला चांगल्या जीवनाची हमी देणाऱ्या आपल्या ‘मिशन’साठी ही निवडणूक निर्णायक असेल. गेल्या पाच-सहा दशकांच्या काँग्रेसच्या सत्ताकाळात देशातील सर्व कुटुंबांना, विशेषत:ज्येष्ठांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले, ते त्यांना आठवत असेल. म्हणून ही निवडणूक आपल्या वर्तमानाला आणि उज्ज्वल भविष्य काळाशी जोडणारी एक संधी आहे.