पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्ही आता तिसऱ्या टर्मची तयारी करत आहोत असा विश्वास पुन्हा एकदा व्यक्त केला आहे. तसंच लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. आम्ही या लोकशाहीच्या उत्सवासाठी उत्सुक आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आपल्या छोट्याश्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी त्यांना विरोधकांनी औरंगजेब म्हटलं त्याचा समाचार घेतला आहे. मला १०४ शिव्या आत्तापर्यंत देऊन झाल्या आहेत त्यात आता औरंगजेब ही भर पडल्याचा टोला त्यांनी लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

“आमचे विरोधकही निवडणुकीची तयारी करत आहेत. आजच त्यांनी माझ्याविषयी १०४ थं दुषण वापरलं. मला औरंगजेब केलं गेलं. मोदींचा शिरच्छेद करा अशी घोषणा केली गेली आहे. अशा सगळ्या नकारात्मक गोष्टी सुरु असल्या तरीही लोकशाहीचा उत्सव सुरु आहे. २६०० हून जास्त पक्ष. ९७ कोटी मतदार, दोन कोटी पहिल्यांदा मतदान करणारे मतदार या उत्सवात सहभागी होत आहेत. “

हे पण वाचा- नरेंद्र मोदी, अमित शहांमध्ये औरंगजेबी वृत्ती; उद्धव ठाकरेंचा घणाघात, म्हणाले ‘यंदा देशात परिवर्तन अटळ’

आणखी काय म्हणाले मोदी?

“आपला देश म्हणजे लोकशाहीची जननी आहे. प्रत्येक भारतीयासाठी ही अभिमानाची बाब आहे. आज सगळं जग २१ वं शतक हे भारताचं शतक आहे असं म्हणतात. मोठ्या रेटिंग एजन्सीज, अर्थतज्ज्ञ, जाणकार हे रायजिंग भारताविषयी आश्वासक आहेत. त्यांच्या मनात कुठल्याही शंका नाहीत. भारतावर आत्ताच्या घडीला प्रश्नचिन्ह नाही कारण संपूर्ण जग हे पाहतं आहे की मागच्या दहा वर्षांत भारताने मोठ्या प्रमाणावर परिवर्तन केलं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी यंत्रणा तयार झाली होती, काम करण्याच्या ज्या पद्धती रुजवल्या गेल्या त्यामध्ये अमूलाग्र बदल झाला आहे. हे बदल करणं इतकं सोपं नव्हतं. मात्र हे बदल घडले आहेत, हे आपण भारतीयांनीच करुन दाखवलं आहे. भारताचा आत्मविश्वास प्रचंड दुणावला आहे. आज आपण विकसित भारत, आत्मनिर्भर भारत या गोष्टी करतो आहे. विरोधी पक्षातले लोक असोत किंवा देशाबाहेरचे लोक असोत ते ही परिस्थिती पाहात आहेत. असंही मोदी यांनी म्हटलं आहे. News 18 च्या रायजिंग भारत या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती होती. त्यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी औरंगजेब या शब्दावरुन विरोधकांना उत्तर दिलं आहे.

संजय राऊत आणि उद्धव ठाकरे मोदींना म्हणाले औरंगजेब

मोदी नाही, औरंगजेब म्हणा अशी टीका संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली होती. बुलढाणा या ठिकाणी झालेल्या शिवसेना उबाठाच्या सभेत ते बोलत होते. नरेंद्र मोदींचा जन्म गुजरातच्या ज्या गावात झाला त्या गावाजवळच औरंगजेबाचा जन्म झाला होता. याच कारणामुळे मोदी हे औरंगजेबासारखा विचार करतात अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. त्याला आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंच्याही प्रचारसभांचा धडाका सुरु आहे. त्यांनीही मोदी आणि अमित शाह यांच्यात औरंगजेबी वृत्ती आहे ही टीका केली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi reacts to aurangzeb jibe said got 104th abuse now scj
First published on: 21-03-2024 at 08:00 IST