लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. भाजपा असो काँग्रेस असो, इंडिया आघाडीतले घटक पक्ष असोत सगळ्यांनीच लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. प्रचारसभांचे नारळ फुटले आहेत. तसंच आता राजकीय नेत्यांचे दौरेही सुरु होतील. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला की आचारसंहिताही लावली जाते. आपण जाणून घेणार आहोत आचारसंहिता म्हणजे काय? आचारसंहिता हा शब्द आपल्यालाला परवलीचा झालेला आहे. कारण आचारसंहिता हा शब्द आपण आजवर अनेकदा ऐकला आहे. पण याचा नेमका अर्थ काय? ते आम्ही आता तुम्हाला सांगणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आचारसंहिता म्हणजे काय?

आचारसंहिता (Code of Conduct) म्हणजे कोणत्याही व्यक्ती, गट किंवा संस्थेसाठी निर्धारित सामाजिक व्यवहार, नियम याला आचारसंहिता म्हटलं जातं. आचारसंहिता ही निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर लागू होते. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतर काय करावं आणि काय करु नये हे आखून दिलेली नियमावली. या नियमावलीला आदर्श आचारसंहिता असं म्हटलं जातं.

आदर्श आचारसंहितेचे नियम काय आहेत?

  • मतदारांना पैसे वाटणे, महागड्या भेटवस्तू देणे, मतदारांना लालूच किंवा आमिष दाखवणे या सगळ्या गोष्टी करण्यास आचारसंहिता काळात सक्त मनाई असते. त्यामुळे या कालावधीत विद्यमान सरकारला कोणत्याही विकासकामांची घोषणा करता येत नाही.
  • आचारसंहिता काळात कोणत्याही सत्ताधारी मंत्र्याला रस्ते, पाणी, वीज देऊ अशी आश्वासनं देता येत नाहीत. तसंच निवडणुकीवर परिणाम होणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याची आपल्या आवडीच्या ठिकाणी बदली करता येत नाही.
  • मतदारांना धमक्या देणं, दबाव आणणं हे आदर्श आचारसंहितेचा भंग करणारं ठरतं.
  • आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय रॅली किंवा बैठक घेण्यासाठी पोलिसांची संमती आवश्यक असते.
  • आचारसंहिता काळात विरोधकांचा पुतळा जाळणं, अशा प्रकारचा निषेध नोंदवणंही नियमांत बसत नाही.

आचारसंहिता कोण तयार करतं?

निवडणुकीत भाग घेणारे राजकीय पक्ष व उमेदवार यासाठी निवडणूक आयोग एक आदर्श आचारसंहिता तयार करत असतो, तिचे पालन करणे प्रत्येक राजकीय पक्षासाठी व उमेदवारांसाठी बंधनकारक असते. भारतीय राज्यघटनेच्या कलम ३२४ नुसार निवडणूक आयोगाकडे निवडणुकीच्या काळात केंद्र आणि राज्य सरकार, सर्व उमेदवार आणि पक्षावर देखरेख करण्याचा अधिकार आहे. आचारसंहितेचं मॅन्युएल निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात येतं. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला की आचारसंहिता लागू होते.

हे पण वाचा- भीम आणि शिकरण यांचं नातं आहे तरी काय? महाभारत काळात या पदार्थाचं नाव काय होतं?

आचारसंहिता का आवश्यक आहे?

आचारसंहिता आवश्यक आहे कारण ती व्यक्ती किंवा संस्थेच्या मूल्ये आणि तत्त्वे प्रस्थापित करण्यास मदत करते. ती व्यक्ती किंवा संस्थेच्या सदस्यांना त्यांचे वर्तन कसे ठेवावे याबद्दल मार्गदर्शन करते. ती व्यक्ती किंवा संस्थेच्या प्रतिष्ठेला वाढवण्यास मदत करते.

आचारसंहितेचे फायदे काय आहेत?

  • निवडणूक आचारसंहिता आवश्यक आहे कारण ती निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक होण्यास मदत करते. ती निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढवते.
  • आचारसंहिता निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक होण्यास मदत करते. आचारसंहिता प्रचाराच्या पद्धतींवर मर्यादा घालते आणि मतदान प्रक्रियेचे नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करते. यामुळे निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक होण्यास मदत होते.
  • आचारसंहिता निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढवते. आचारसंहिता निवडणूक प्रक्रियेतील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराला प्रतिबंध करते. यामुळे निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढते.
मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is a code of conduct when exactly does it apply scj
First published on: 17-02-2024 at 17:24 IST