छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपानं जोरदार मुसंडी मारली आहे. राजस्थान आणि छत्तीसगडसारखी राज्ये काँग्रेसच्या हातून जाण्याची शक्यता आहे. अशातच भाजपा नेते सीटी रवी यांनी काँग्रेसचे नेते, राहुल गांधी यांना टोला लगावला आहे. “आता सगळ्यात मोठा पनवती कोण?” असा सवाल सीटी रवी यांनी उपस्थित केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्तीसगडमध्ये भाजपा ५३ तर काँग्रेस ३५ जागांवर आघाडीवर आहे. तर, तेलंगणात काँग्रेस ६३ आणि भारत राष्ट्र समिती ( बीआरएस ) ४२ आणि भाजपाचे ९ उमेदवार आघाडीवर आहेत. मध्य प्रदेशात भाजपा १६२ तर काँग्रेस ६५ आघाडीवर असल्याचं दिसत आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. भाजपा ११२ तर काँग्रेस ७२ जागांवर आघाडीवर आहे.

यावरून सीटी रवी ‘एक्स’ अकाउंटवर एक ट्वीट केलं आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसला मेन्शन करत “आता सगळ्या मोठा पनवती कोण?” असा सवाल सीटी रवी यांनी उपस्थित केला आहे.

विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला होता. त्यानतंर राजस्थानमधील बायतू येथील प्रचारसभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘पनवती’ असे संबोधून टीका केली होती.

“आमचे खेळाडू तिथे चांगले जिंकणार होते, पण पनवतीमुळे त्यांचा पराभव झाला. टीव्हीवाले हे सांगणार नाहीत, पण जनतेला सर्व माहीत आहे,” असं राहुल गांधी म्हणाले होते. हाच संदर्भ घेऊन सीटी रवी यांनी राहुल गांधींना लक्ष्य केलं आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whos biggest panauti bjp leader ct ravi jabs rahul gandhi as bjp wins big in 3 states ssa
Show comments