Premium

इम्रान खान तुरुंगात, देशात आर्थिक अस्थिरता; पाकिस्तानमध्ये वेळेवर सार्वत्रिक निवडणुका घेणे शक्य आहे का?

अन्वर अल हक काकर यांनी पंतप्रधानपद स्वीकारल्यापासून ९० दिवसांत सार्वत्रिक निवडणुका घेणे अनिर्वाय आहे.

pakistan election_imran khan
इम्रान खान (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सध्या पाकिस्तान आर्थिक, सामाजिक अस्थिरतेतून जात आहे. अशा स्थितीत तेथे अन्वर अल हक काकर हे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून देशाचा कारभार हाकत आहेत. देशात शातंतेत सार्वत्रिक निवडणुका घेण्याची प्रमुख जबाबदारी त्यांच्यावर आहे. मात्र पाकिस्तामध्ये सध्या असलेली परिस्थिती पाहता ही निवडणूक वेळेवर घेणे शक्य आहे का? देशातील वेगवेगळे पक्ष काळजीवाहू सरकारवर टीका का करत आहेत? पीटीआय पक्षाची नेमकी भूमिका काय? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करू या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवडणुकीची तारीख ८ फेब्रुवारी २०२४

अन्वर अल हक काकर यांनी पंतप्रधानपद स्वीकारल्यापासून ९० दिवसांत सार्वत्रिक निवडणुका घेणे अनिर्वाय आहे. त्यांनी ऑगस्ट महिन्यात काळजीवाहू पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारला होता. काकर यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पाकिस्तानी निवडणूक आयोगाने ८ फेब्रुवारी २०२४ ही मतदानाची तारीख निश्चित केलेली आहे. मात्र सध्या पाकिस्तानसमोर आर्थिक अस्थिरता, राजकीय अस्थितरता, महागाई अशी अनेक संकट आ वासून उभी आहेत. त्यामुळे या देशात ठरल्याप्रमाणे वेळेवर निवडणूक होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Will pakistan general elections happen on time after arrest of imran khan know detail information prd

First published on: 04-12-2023 at 22:17 IST
Next Story
काँग्रेसचा तीन राज्यांत पराभव, भाजपाचा बोलबाला; लोकसभा निवडणुकीसाठी गणितं बदलणार?