कोल्हापूर : परदेश दौऱ्यावर असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळांनी इटलीमध्ये व्हेनिस शहरात स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी स्तब्धता पाळून त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखातून कुटुंबीयांना सावरण्याची हिंमत आणि शक्ती मिळावी, अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली.

बँकेचे अध्यक्ष, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ,  उपाध्यक्ष आमदार राजू आवळे,  खासदार  संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, माजी खासदार निवेदिता माने, ए. वाय. पाटील, प्रताप उर्फ भैय्या माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, संतोष पाटील, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, प्रा.अर्जुन आबिटकर, विजयसिंह माने, श्रुतिका काटकर, स्मिता गवळी आदी संचालक तसेच गोकुळचे संचालक युवराज पाटील, बँकेचे माजी संचालक असिफ फरास उपस्थित होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Board of directors of kolhapur district bank pay tribute to pn patil from italy zws
First published on: 23-05-2024 at 22:19 IST