कोल्हापूर :  वैद्यकीय शिक्षण, पालकमंत्री हसन मुश्रीफ हे पंधरवड्याच्या परदेशी सहलीवर जात असताना जनतेकडून रजा मंजूर करून घातली आहे. फलक उभारून केलेल्या त्यांच्या या आगळ्या कृतीची चर्चा होत आहे. रजा मंजुरीबद्दल मंत्री मुश्रीफ यांनी जनतेचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, इटली व स्पेनच्या सहलीवर पंधरवड्यासाठी जात असलेल्या मंत्री मुश्रीफ यांनी गेल्या पंधरवड्यापासून प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेकडून पंधरवड्याची रजा मंजूर करून घेतली आहे. शुक्रवारपासून दि. १० ते २४ मंत्री  मुश्रीफ परदेश दौऱ्यावर जात आहे. त्यांच्या कागलमधील घराबाहेरच्या फलकावर याबाबतचे जाहीर निवेदन केले आहे.

हेही वाचा >>> कोल्हापूर, हातकणंगलेत शक्तिप्रदर्शनाने प्रचाराची सांगता; अखेरच्या दिवशीही मुख्यमंत्री शिंदे यांच्या जोडण्या सुरूच

संचालकांचा आनंद गगनात !

त्यावर लिहिलेले आहे कि, ४ जून रोजीच्या मतमोजणीसाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा! पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यावेळी पंतप्रधाननिश्चित होतील, याची खात्री आहे. आगामी महिनाभर देशभरात आचारसंहिता सुरू असल्यामुळे मतदारसंघ, जिल्हा, राज्य व मंत्रालयामध्ये व्यक्तिगत व विकासाची कामे होत नाहीत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या सर्व संचालकांनी स्वखर्चाने इटली व स्पेनचा प्रदेश दौरा आयोजित केला आहे. 

हेही वाचा >>> लाल परी ‘इलेक्शन ड्युटी’वरी; परी प्रवासी वाऱ्यावरी

वैद्यकीय सेवा सुरूच

या फलकावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हंटलेले आहे, दहा ते २४ मे या कालावधीमध्ये माझा मोबाईल सुरूच असेल. कागलमधील आणि मुंबईतील निवासस्थानी रुग्णसेवेसाठी पुरेशा मनुष्यबळाची व्यवस्था केलेली आहे.

संचालकांची दुसऱ्यांदा विदेशवारी

दरम्यान, यापूर्वी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्यासह संचालकांनी दुबई, मॉरिशस या देशाचा दौरा केला होता. आठवड्याभराच्या या दौऱ्यामध्ये त्यांनी तेथील बँकिंग व्यवसायाची तसेच ऊस शेती, साखर उद्योगाची माहिती घेतली होती. या दौऱ्यात १५ संचालकांचा समावेश होता. कोल्हापूर जिल्हा बँकेत प्रशासकीय नियुक्त करण्यात आला होता.२०१५ मध्ये संचालक मंडळ नियुक्त झाले होते. त्यांनी उत्तम कामगिरी दोन वर्षातच केली होती. त्यानंतर दोन वर्षानंतर संचालकांची पहिली दुबई, मॉरिशस वारी झाली होती. त्यामध्ये उपाध्यक्ष आप्पी पाटील, विनय कोरे, पी एन पाटील, महादेवराव महाडिक शिंदे, आर के पोवार ,ए वाय पाटील,  हे जाऊ शकले नव्हते.  तर मुश्रीफ यांच्या समवेत के पी पाटील, अशोक चराटी ,राजू आवळे, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, भैय्या माने, सर्जेराव पाटील पेरीडकर, संजय मंडलिक, संतोष पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर,  विलास गाताडे, अनिल पाटील, आसिफ फरास, निविदिता माने, उदयानी साळुंखे असे पंधरा संचालक रवाना झाले होते.