कोल्हापूर : येथे आजपासून आंबा महोत्सवाला सुरुवात झाली. विविध ४७ प्रकारचे आंबे पाहून खरेदीदार खुश झाले. त्यातील दीड किलो वजनाचा वनराज आंबा पाहण्यासाठी गर्दी झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न मंडळाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाच्या वतीने राजारामपुरीतील भारत हाऊसिंग सोसायटीच्या सभागृहात आंबा महोत्सवाला सुरुवात झाली असून तो चार दिवस चालणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या प्रदर्शनाचे उद्घाटन केले.

हेही वाचा – यंदाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ऊसाला एफआरपी पेक्षा जादा रक्कमेला मंजूरी देण्याबाबत कारखान्यांना लेखी आदेश द्यावेत; राजू शेट्टी यांची साखर आयुक्तांकडे मागणी

हेही वाचा – कर्ता पुरुषच गेला,आता आम्हाला आधार कुणाचा? लोकरेंच्या पत्नी, मातेच्या आक्रोशाने समरजितसिंह घाटगेंसह नातेवाईक गलबलले

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे ३२ स्टॉल महोत्सवांमध्ये मांडण्यात आले आहे. रविवारचा दिवस असल्याने पहिल्या दिवशी महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला. खरेदीदारांना थेट उत्पादक शेतकऱ्यांकडून आंबा खरेदी करता येणार आहे.
महोत्सवात दीड किलो वजनाचा वनराज हा आंबा आकर्षण ठरला आहे. प्रती डझन ३०० ते ७०० रुपये दराने आंबा खरेदी करता येईल. भौगोलिक मानांकन प्राप्त कोकणातील अस्सल रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, पायरी, केसरी यासह विविध ४७ प्रकारचे आंबे प्रदर्शनामध्ये सादर करण्यात आले आहेत, असे उपव्यवस्थापक सुभाष घुले यांनी सांगितले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mangoes in kolhapur 47 varieties of mangoes presented at the festival ssb